नाट्य परिषदेतर्फे रत्नागिरीत 27 ला रंगभूमी दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्य परिषदेतर्फे रत्नागिरीत 27 ला रंगभूमी दिन
नाट्य परिषदेतर्फे रत्नागिरीत 27 ला रंगभूमी दिन

नाट्य परिषदेतर्फे रत्नागिरीत 27 ला रंगभूमी दिन

sakal_logo
By

rat१९१६.txt

रत्नागिरीत सोमवारी रंगभूमी दिन

नाट्यगृहाबाहेर होणार कार्यक्रम ; कलाकार सुधाकर बेहेरे यांचा सत्कार

रत्नागिरी, ता. २० : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे सोमवारी (ता.२७) येत असलेल्या जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणे दिमाखदार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या प्रवेश पायऱ्यांवर हा कार्यक्रम होणार असून या वेळी कोतवडे येथील ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर बेहेरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
नाट्य परिषदेच्या रत्नागिरी कार्यकारिणीची सभा परिषदेच्या कार्यालयात शनिवारी (ता. १८) झाली. त्या वेळी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष, नाट्य परिषद मध्यवर्तीचे विश्वस्त उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जागतिक रंगभूमी दिन कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले.
प्रतिवर्षीप्रमाणे सावरकर नाट्यगृहाच्या प्रवेश पायऱ्यावर साजरा होणार आहे. यामध्ये एकपात्री प्रवेश, गीत गायन, वादन, नृत्य आणि करावके गीत सादरीकरण असे कार्यक्रम सादर होणार आहेत. त्यासाठी सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या कलाकारांनी वामन कदम आणि सुनील बेंडखळे यांच्याकडे नाव नोंदणी करून आपल्या प्रवेशाची निश्चिती करावी.
नुकत्याच पार पडलेल्या गद्य मराठी नाटक, संगीत नाटक आणि बालनाट्य स्पर्धेतील बक्षिस विजेत्या गुणी कलाकारांचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने गुणगौरव करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील समस्त कलाप्रेमी रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन शाखा कार्यध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.