शाश्वत शेतीच्या उपक्रमासह शेतकऱ्यांचे हितही जपणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाश्वत शेतीच्या उपक्रमासह 
शेतकऱ्यांचे हितही जपणार
शाश्वत शेतीच्या उपक्रमासह शेतकऱ्यांचे हितही जपणार

शाश्वत शेतीच्या उपक्रमासह शेतकऱ्यांचे हितही जपणार

sakal_logo
By

शाश्वत शेतीच्या उपक्रमासह
शेतकऱ्यांचे हितही जपणार

ब्रिगेडीयर सुधीर सावंत; किर्लोसला चर्चासत्र

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १९ ः शेतकऱ्यांचे आरोग्य व आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शाश्वत शेतीचे उपक्रम गावोगावी राबविण्यात येणार असल्याचे माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी चर्चासत्रात बोलताना स्पष्ट केले.
किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापकांच्या उपस्थितीत समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यासाठी आज चर्चासत्राचे आयोजन प्रकल्पाचे जनक ब्रिगेडीयर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ब्रिगेडीयर सावंत यांनी, शेतकऱ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी नैसर्गिक शेतीचा शाश्वत उपक्रम गावोगावी राबविण्यात येईल, असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे थेट संभाषण करून चर्चा केली. समृद्ध आणि गाव प्रकल्पामध्ये विविध घटकांचा समावेश आहे. या सर्व घटकांचे एकात्मिक मॉडेल बनवून या प्रकल्पास आर्थिक तरतूद करावी, मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. कृषी विज्ञान केंद्रामार्फत समृध्द आणि आनंदी गाव प्रकल्प, मिलेट मिशन, वृक्ष लागवड अभियान, पशुसंवर्धन व दुग्ध विकास प्रकल्पांचे आराखडे सिंधुरत्न समृद्धी योजनेमध्ये सादर करण्याचे ब्रिगेडीयर सावंत यांनी सूचित केले. वृक्ष लागवड अभियानाद्वारे ओरोस हे गाव ‘ग्रीन सिटी’ बनविण्यासाठी प्रयत्न करणार असून रासायनिक खते व कीटकनाशके हद्दपार करण्यासाठी नैसर्गिक खते व नैसर्गिक कीटकनाशके उत्पादनावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. समृध्द आणि आनंदी गाव प्रकल्पामध्ये सुदृढ आरोग्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. या उपक्रमात जिल्ह्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.