
रत्नागिरी-संक्षिप्त
पान ५ साठी, संक्षिप्त)
वाशीत बाजार समितीची नवीन नियमावली
रत्नागिरी ः दरवर्षीप्रमाणे आंबा हंगाम सुरू झाला आहे. २३ मार्चपासून रमजान महिना सुरू होत आहे. त्यामुळे कोकणातील आंब्याची वाशी बाजार समितीच्या फळ बाजार आवारात शेतमाल वाहनांची मोठी आवक होते. या दिवसांत बाजार आवारामध्ये वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी होते. आवारातील कामकाज सुरळीत होण्यासाठी नियोजन व उपाययोजना करण्याकरिता फळ बाजार आवारातील फ्रंट ऑफ युनायटेड फ्रूटस असोसिएशनशी संलग्न असलेल्या सर्व व्यापारी संघटनेची संयुक्त बैठक झाली. त्यात फळ आवारातील व्यवसायासाठी एकमताने निर्णय घेऊन नियमावली करण्यात आली आहे. आंबा घेऊन येणारी वाहने सकाळी १० वाजेपर्यंत फक्त आवक गेट क्र. ३ मधून बाजार आवारात येतील. त्यानंतर उर्वरित वाहनांना दुपारी १२.३० नंतर प्रवेश दिला जाईल. दक्षिणेतील आंबा घेऊन येणाऱ्या वाहनांना दोन्ही गेट, मंदिर व मका गेटमधून प्रवेश दिला जाईल. गाडी त्वरित खाली करून बाहेर काढावी लागणार आहे. नियम मोडल्यास दंड आकरण्याचा निर्णय बैठकित घेण्यात आला आहे.
९००७४
तायक्वॉंदोमध्ये साखळकरला सुवर्णासह दोन पदके
रत्नागिरी ः तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वॉंदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी महाराष्ट्र राज्य बालगट तायक्वॉंदो अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीतील युवा मार्शल आर्ट अकॅडमीचे खेळाडू स्वरा साखळकर हिने विशेष ठसा उमटवला. पुमसे प्रकारात स्वरा हिने पेअरला (जोडी) सुवर्णपदक पटकावले, तर वैयक्तिक पुमसे प्रकारात रौप्यपदक पटकावले. स्वरा साखळकर ही ल. ग. पटवर्धन शाळेची विद्यार्थिनी असून चौथीमध्ये शिकत आहे. या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.