रत्नागिरी-रत्नागिरीची अपेक्षा सुतार भारतीय संघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरीची अपेक्षा सुतार भारतीय संघात
रत्नागिरी-रत्नागिरीची अपेक्षा सुतार भारतीय संघात

रत्नागिरी-रत्नागिरीची अपेक्षा सुतार भारतीय संघात

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat19p37.jpg- अपेक्षा सुतारKOP23L90134
-----------
रत्नागिरीची अपेक्षा सुतार भारतीय संघात

आशियाई खो-खो स्पर्धा ः महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंची निवड
रत्नागिरी, ता. 19 ः तामुलपूर, गुवाहाटी (आसाम) येथे सोमवारपासून (ता. 20) सुरू होत असलेल्या चौथी आशियाई खो-खो स्पर्धेसाठी भारतीय संघात महाराष्ट्राच्या तीन महिला व तीन पुरुष खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये रत्नागिरीची राष्ट्रीय खो-खो पटू अपेक्षा सुतार हिचा समावेश असून ती भारतीय संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम. त्यागी यांनी भारतीय संघाची घोषणा केली. महाराष्ट्राचे सरचिटणीस गोविंद शर्मा हे निवड समितीचे सदस्य होते. या स्पर्धेसाठी खो-खो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे महाराष्ट्रातील डॉ. चंद्रजीत जाधव व सचिन गोडबोले यांची उपसमितीवर निवड झाली आहे. या स्पर्धेत यजमान भारतासह, नेपाळ, भुतान, बांगलादेश, मलेशिया, इराण, द. कोरिया, श्रीलंका व इंडोनेशिया असे नऊ संघ आसाम येथे दाखल झाले असून इराक व पाकिस्तान या संघांना सरकारी परवानगी न मिळाल्याने ते सहभागी होणार नसल्याचे एम. त्यागी यांनी सांगितले. स्पर्धेत इराणच्या पुरुषांचा तर मलेशियाचा महिलांचा संघ सहभागी होणार असून इतर सर्व देशांचे पुरुष-महिला दोन्ही संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या सर्व खेळाडूंचे खो-खो पटूंतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
भारतीय पुरुष संघ : अमित पाटील, अक्षय गणपुले व अरुण गुणकी (सर्व रेल्वे), अक्षय भांगरे, सुयश गरगटे व अनिकेत पोटे (सर्व महाराष्ट्र), अवधूत पाटील (कोल्हापूर), एम. के. गौतम (कर्नाटक), ए. एस. एन. आगिरेड्डी (आंध्र प्रदेश), मदन (दिल्ली), एस. संथरू (तामिळनाडू), व्ही. कबिलन (पुदूचेरी), सचिन भारगो (मध्य भारत), आकाश (उत्तर प्रदेश) व मुकेश (राजस्थान) राखीव : सुभम काची (मध्य प्रदेश), सीबीन एम. (केरळ) व ध्रुव (हरयाणा).
भारतीय महिला संघ : प्रियंका इंगळे, गौरी शिंदे व अपेक्षा सुतार (सर्व महाराष्ट्र), निकिता पवार (भारतीय विमान प्राधिकरण), परविन निशा (दिल्ली), एल. मोनिका (कर्नाटक), बिन्दु (हरयाणा), निर्मला भाटी (राजस्थान), गुरवीर कौर (पंजाब), अर्चना माझी (ओडिशा), दीपिका चौधरी (पी. बंगाल), मीनू (हरयाणा), रंजना (आसाम), नसरीन (भारतीय विमान प्राधिकरण) व मधु (दिल्ली) राखीव : रीहका (मध्य भारत), मोनिका (बिहार) व रेश्मा राठोड (महाराष्ट्र).