पेंडूर मागाससेल विभाग प्रमुखपदी तळगावकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेंडूर मागाससेल विभाग 
प्रमुखपदी तळगावकर
पेंडूर मागाससेल विभाग प्रमुखपदी तळगावकर

पेंडूर मागाससेल विभाग प्रमुखपदी तळगावकर

sakal_logo
By

90444
पेंडूर ः भिवा तळगावकर यांना शुभेच्छा देताना बाळ महाभोज, श्वेता सावंत, कमलाकर गावडे आदी.

पेंडूर मागाससेल विभाग
प्रमुखपदी तळगावकर
सिंधुदुर्गनगरी ः उद्धव ठाकरे शिवसेना पेंडूर जिल्हा परिषद विभाग मागास सेल विभाग प्रमुखपदी भिवा तळगावकर यांची मालवण उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज यांनी नियुक्ती केली. जिल्ह्यात ठाकरे पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने विभाग प्रमुखांची नियुक्ती केली जात आहे. त्यानुसार पेंडूर जिल्हा परिषद मागास सेल विभाग प्रमुखपदी तळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. उपतालुकाप्रमुख महाभोज यांनी आज पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी महिला तालुका प्रमुख श्वेता सावंत, विभाग प्रमुख कमलाकर गावडे, उपविभाग प्रमुख प्रदीप सावंत, अण्णा गुराम, रवींद्र साळकर, लता खोत, संतोष कदम, शिशुपाल राणे, बाबू टेंबुलकर, विनोद सावंत, वांदेश ढोलम, संदीप सावंत, विष्णू लाड, किशोर भगत आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित मागास सेल विभाग प्रमुख तळगावकर यांनी पक्षवाढीसाठी आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
....................
ओरोस येथे उद्या ‘शिमगोत्सव रोंबाट’
सिंधुदुर्गनगरी ः भाजप ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्गच्यावतीने गुरुवारी (ता.२३) गोविंद सुपर मार्केट मैदान, ओरोस येथे ‘शिगमोत्सव रोंबाट २०२३’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाजप ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात नेरुरचे व स्थानिक लोककलाकार नृत्य, हालते देखावे सादर करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिक, जिल्हा मुख्यालय योगदान व्यक्ती, पत्रकार यांचे सत्कार केले जाणार आहेत. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, विशाल परब, ओरोस सरपंच आशा मुरमुरे, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, राजन तेली, भाई सावंत, प्रभाकर सावंत, सुप्रिया वालावलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अमोल ग्रुप ओरोसने केले आहे.