
ओझरम शाळेस संगणक, प्रिंटर
ओझरम शाळेस संगणक, प्रिंटर
कणकवली ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम क्रमांक १ शाळेला ओझरम-तीर्थवाडीचे रहिवासी व मुंबई पोलिस संजय राणे यांनी संगणक संच, तर सिमेन्स ऐक्य एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट, ठाणे यांच्या माध्यमातून ट्रस्टचे अध्यक्ष अशोक राणे यांनी प्रिंटर देणगी स्वरुपात भेट दिला. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष राणे यांनी आपल्या शाळेतील मुलांनी संगणकाचे योग्य ज्ञान घेऊन अध्ययनातील त्याचा उपयोग जाणून घ्यावा व योग्य सराव करावा, असे आवाहन केले. यावेळी उपसरपंच प्रशांत राणे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर राणे, एकनाथ राणे, दाजी राणे, सदानंद (बाबू) राणे, सुरेश राणे, गणेश राणे, बंडू राणे, मुख्याध्यापक स्नेहल कदम, शाळेतील शिक्षक विनायक जाधव, श्रीया गोसावी, ज्योती ब्रह्मदंडे व विद्यार्थी होते.
-------------------
पिकुळेत शनिवारी दशावतारी नाटक
दोडामार्ग ः पिकुळे-लाडाचे टेंब येथे शनिवारी (ता. २५) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ कुडाळ-नेरुर यांचा ‘स्त्री-संगम स्वरुपिणी’ हा नाट्यप्रयोग रात्री एकला होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी सहाला श्रींची महापूजा, त्यानंतर आरती व स्थानिक ग्रामस्थांची भजने होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन पिकुळेवासीयांनी केले आहे.