संशोधन प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशोधन प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण
संशोधन प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण

संशोधन प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण

sakal_logo
By

90617
देवगड : येथील महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सुखदा जांबळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


संशोधन प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण

‘आपले प्रश्न आपले विज्ञान’; देवगड महाविद्यालयाचे यश

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ : विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्याकरिता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करणे, या हेतूने आयआयटी मुंबई, उन्नत महाराष्ट्र अभियान कक्षातर्फे यंदा ‘आपले प्रश्न आपले विज्ञान’ हा उपक्रम राबविण्यात आला. चिपळूण येथील महाविद्यालयात येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याअंतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागातून एकूण ४२ प्रकल्प सहभागी झाले. त्यामध्ये येथील स. ह. केळकर महाविद्यालयातून ५ प्रकल्प पाठविण्यात आले होते. या एकूण ४२ प्रकल्पांमधून १६ प्रकल्पांची निवड अंतिम सादरीकरणाकरिता करण्यात आली. त्यामध्ये केळकर महाविद्यालयातील दोन प्रकल्प निवडले गेले. यामध्ये ‘देवगड येथील मासेमारी पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास’, ‘तारामुंबरी येथील कांदळवनातील बदल आणि लोकांचा दृष्टिकोन’, आदींचा समावेश होता. यामध्ये आकाश पराळे, मयुरेश तारी, भार्गव सारंग या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांना प्रा. गुरुप्रसाद घाडी (भूगोलशास्त्र विभाग), प्रा. नागेश दप्तरदार (वनस्पतीशास्त्र विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्पांचे सादरीकरण या विद्यार्थ्यांनी डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण येथे केले. सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. निवड झालेल्या प्रकल्पांचे प्रकाशन उन्नत महाराष्ट्र कक्षाच्यावतीने पुस्तिकेत करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी अनुदान रक्कम देण्यात येणार आहे. प्रभारी प्राचार्या सुखदा जांबळे, पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले.