सावंत, कोकाटेंचा ठाकरे गटातर्फे सत्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंत, कोकाटेंचा ठाकरे गटातर्फे सत्‍कार
सावंत, कोकाटेंचा ठाकरे गटातर्फे सत्‍कार

सावंत, कोकाटेंचा ठाकरे गटातर्फे सत्‍कार

sakal_logo
By

90670
खारेपाटण : येथील कार्यक्रमात शिवसेना जिल्‍हाप्रमुख सतीश सावंत यांचा सत्‍कार खारेपाटण-तळेरे शिवसेना यांच्यावतीने करण्यात आला.

सावंत, कोकाटेंचा ठाकरे गटातर्फे सत्‍कार
खारेपाटण, ता.२२ : शिवसेना ठाकरे गट जिल्‍हाप्रमुखपदी नुकतीच सतीश सावंत यांची निवड झाली. तर खारेपाटण-तळेरे विभागप्रमुखपदी एकनाथ कोकाटे यांची निवड करण्यात आली. या दोघांचाही सत्‍कार खारेपाटण-तळेरे शिवसेनेच्यावतीने करण्यात आला.
खारेपाटण हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुका प्रमुख महेश उर्फ गोट्या कोळसुलकर, उपविभाग प्रमुख शिवाजी राऊत, शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर वळंजू, अनंत गांधी, बाळा शेट्ये, प्रकाश नर, साळीस्तेचे सरपंच प्रभाकर ताम्हणकर, शिवसेना महिला विभाग प्रमुख अंजली मेस्त्री, वारगाव माजी सरपंच बापू नर, युवा सेना विभाग प्रमुख तेजस राऊत, प्रज्योत मोहिरे, शाखा प्रमुख गिरीश पाटणकर आदी उपस्थित होते. सतीश सावंत यांचा सत्कार साळीस्तेचे सरपंच ताम्हणकर यांच्या हस्ते तर एकनाथ कोकाटे यांचा सत्‍कार जिल्‍हाप्रमुख सावंत यांच्या हस्ते करण्यात झाला.