तीन इलेक्ट्रिक दुचाकी पिंगुळीत जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन इलेक्ट्रिक दुचाकी
पिंगुळीत जळून खाक
तीन इलेक्ट्रिक दुचाकी पिंगुळीत जळून खाक

तीन इलेक्ट्रिक दुचाकी पिंगुळीत जळून खाक

sakal_logo
By

90762
पिंगुळी ः इलेक्ट्रिक दुकानातील दुचाकी आगीत जळून खाक झाल्या.

तीन इलेक्ट्रिक दुचाकी
पिंगुळीत जळून खाक

कुडाळ, ता. २२ ः पिंगुळी-वरडेश्वर येथील एका इलेट्रिक दुचाकी वाहनांच्या दुकानात लागलेल्या आगीत तीन दुचाकी जळून खाक झाल्या. ही घटना आज दुपारी घडली. तेथील ग्रामस्थ व स्टॉलधारकांना ही घटना समजताच त्यांनी तातडीने धाव घेत आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. नेमकी आग कशी लागली हे समजले नाही. आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन बंबाची वाट न पाहता सर्व ग्रामस्थ मदतीसाठी धावून आल्याने आग अटोक्यात आली; मात्र तिन्ही इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्या.