
भिरवंडेत नेहा सातार्डेकर पैठणीच्या मानकरी
kan231.jpg
90800
भिरवंडेः येथील पैठणीच्या मानकरी महिलांचा गौरव करताना जयवंत सावंत, अजित सावंत, प्रकाश घाडीगांवकर, संदीप सावंत आदी.
----
भिरवंडेत नेहा सातार्डेकर पैठणीच्या मानकरी
गुढीपाडव्यानिमित्त आयोजन; सुस्मिता गावकर उपविजेत्या
कनेडी, ता. २३ः नववर्षांचे स्वागत आणि गुढी पाडव्याचे औचित्य साधून श्रीदेव रामेश्वर मंदिर येथे आयोजित खेळ पैठणीचा स्मार्ट सुनबाईचा या स्पर्धेतील मानकरी भिरवंडे येथील नेहा निलेश सातार्डेकर यांनी पटकावला आहे. उपविजेत्या सुस्मिता सुधाकर गावकर तर मयुरी रुपेश सातार्डेकर यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. मंडळाचे उपाध्यक्ष जयंवत सावंत, सेवानिवृत्त शिक्षिका प्रमिला सावंत, सेवानिवृत्त शिक्षिका रश्मी सावंत, पत्रकार तथा संचालक अजित सावंत आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना तीन पैठणी देऊन गौरविण्यात आले. पैठणी खेळाचे सूत्रसंचालन उमेश परब यांनी केले. सहभागी स्पर्धाकांनाही भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आले.
कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथे गुढी पाडव्याचे औचित्य साधून बुधवारी (ता. २२) रात्री खेळ पैठणीचा स्मार्ट सुनबाईचा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गावातीलच तब्बल ३८ महीला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला. शेकडो ग्रामस्थ आणि महिला या स्पर्धेसाठी उपस्थित होत्या. रात्री अकरा वाजल्यापासून मध्यरात्री एक वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगली. स्पर्धेच्या सहभागी महिलांना हमखास बक्षीस देण्यात आले. गुढीपाडव्याचे औचित्यसाधून आयोजित या स्पर्धेला डॅा. प्रथमेश मोहनराव सावंत यांनी पैठणी पुरस्कृत केल्या होत्या. श्रीदेव रामेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
मध्यरात्री एक वाजेपर्यंत विविध प्रकारची महीलासाठी उखाणी, बॅल आणने, रंगित कवड्या निवडे, केसात स्ट्रॅा लावणे अशा विविध खेळाने पैठणीचा खेळ रंगला होता. यासाठी गुणपध्दतीने विजेत्यांची निवड करण्यात आली. सुप्रसिध्द सूत्रसंचालक तथा पत्रकार उमेश परब यांनी मनोरंजनात्मक प्रश्न विचारून रसिकप्रेक्षकांची ही दाद मिळवली. यावेळी देवलये संचालयक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत, सचिव गणपत सावंत, मंडळाचे उपाध्यक्ष जयंवत सावंत, संचालक संजय सावंत, प्रकाश घाडीगांवकर, संदीप सावंत, अजित सावंत, तुषार सावंत, प्रथमेश सावंत, मुकेश सावंत, राजू पाटील, निलेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण संचालक तुषार सावंत, साई दळवी यांनी केले.