राजापूर ः दीपक देसाई ठरले सी लायन श्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः दीपक देसाई ठरले सी लायन श्री
राजापूर ः दीपक देसाई ठरले सी लायन श्री

राजापूर ः दीपक देसाई ठरले सी लायन श्री

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२३p२२.jpg ः KOP२३L९०८३७ राजापूर ः दीपक देसाई याला ‘सी लायन श्री २०२३’ मानाचा पुरस्कार देऊन गौरवताना मान्यवर.
----------------
दीपक देसाई ठरले सी लायन श्री

शरीरसौष्ठव स्पर्धा ; रशीद शेख ठरला उगवता तारा

राजापूर, ता. २३ ः तालुक्यातील नाटे येथे झालेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये तालुक्यातील सी लायन फिटनेस जीमचा शरीरसौष्ठवपटू दीपक देसाई ‘सी लायन श्री २०२३’ चा मानकरी ठरला. बेस्ट पोजर म्हणून आरएसपीएम जीम, राजापूरचा हर्षद मांडवकर तर उगवता तारा म्हणून सी लायन फिटनेस जीमचा रशीद शेख यांना गौरवण्यात आले.
नाटेसारख्या ग्रामीण भागामध्ये संदेश पाथरे आणि दुष्यंत पाथरे या पिता-पुत्रांनी सुमारे ४ वर्षापूर्वी सुरू केलेल्या सी लायन फिटनेस अँड जीमच्या पुढाकाराने ही जिल्हासस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. संदेश पाथरे यांच्या हस्ते स्पर्धेच्या झालेल्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू शाश्वत मानकर, बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद जोशी, राजापूर तालुका हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनचे अध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्ष दीनानाथ कोळवणकर, सागरी पोलिस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील, उद्योजक सुनील भणसारी, नाटेचे सरपंच संदीप बांदकर, उपसरपंच अन्वर धालवेलकर, नाटे व्यापारी संघाचे अध्यक्ष रमेश लांजेकर, मनोज आडविरकर आदी उपस्थित होते.