कवी कृष्णा देवळींचा डेगवेवासीयांतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवी कृष्णा देवळींचा डेगवेवासीयांतर्फे सत्कार
कवी कृष्णा देवळींचा डेगवेवासीयांतर्फे सत्कार

कवी कृष्णा देवळींचा डेगवेवासीयांतर्फे सत्कार

sakal_logo
By

swt239.jpg
90873
डेगवेः गीतकार कृष्णा यांचा सत्कार करताना अभिलाष देसाई व अन्य मान्यवर.

कवी कृष्णा देवळींचा
डेगवेवासीयांतर्फे सत्कार
ओटवणे, ता. २३ः येथील धार्मिकतेचे गाढे अभ्यासक गीतकार कवी कृष्णा देवळी यांचा डेगवे येथे सत्कार करण्यात आला. डेगवे येथील स्थापेश्वर देवस्थानावर त्यांनी ''धन्य हा स्थापेश्वर अवतार'' हे गीत रचनाबद्ध केले. सध्या हे धार्मिक गीत सोशल मीडियावर भाविकांच्या खास पसंतीस पडत आहे. त्यांनी लिहिलेल्या सुंदर धार्मिक अभंगाचा सन्मान करीत त्यांचा शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यापूर्वी गीतकार कृष्णा यांनी ओटवणेचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ, कोलगाव येथील श्री देव कलेश्वर, बांदा श्री देव बांदेश्वर, बावळाट श्री देवी माऊली यांवर अभंगरुपी गीते रचली आहेत. ही गीते सुद्धा हजारो भाविकांच्या मुखांत ऐकायला मिळत आहेत. सध्या यूट्युबच्या माध्यमातून ही सर्वच अभंगरुपी गीते भाविकांना ओढ लावीत आहेत. डेगवे स्थापेश्वर देवस्थांनावर लिहिलेल्या अभंगरुपी गीताची दखल घेत गुढीपाडव्या दिवशी डेगवे मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, पानवळ कॉलेजचे प्राचार्य डॉ. काजरेकर, बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले, सरपंच राजन देसाई, उपसरपंच मंगेश देसाई, देवस्थान बांधकाम कमिटी अध्यक्ष अभिलाष देसाई, भगवान देसाई, मधुकर देसाई, प्रेमानंद देसाई, उत्तम देसाई, प्रवीण देसाई, उदय देसाई, मानकरी उपस्थित होते.