
तारकर्लीतील चिमुकल्यांची अशीही सामाजिक बांधिलकी
९०८८७
तारकर्लीतील चिमुकल्यांची
अशीही सामाजिक बांधिलकी
मालवण : तारकर्लीतील बाल भजन मंडळातील चिमुकल्यांनी शिमगा खेळातून जमलेली रक्कम अविनाश धुरत या गरजू तरुणाला भेट म्हणून देत सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडविले. तारकर्ली येथील बाल भजन मंडळ शिमगोत्सवात गावात फिरून निधी गोळा करतात. दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून असे उपक्रम राबविले जातात. यावर्षीही या मंडळातील चिमुकल्यांनी घरोघरी जात निधी गोळा केला. यात रोहन कांदळगावकर, नैतिक कांदळगावकर, सिद्धेश टिकम, निनाद मोंडकर, यज्ञेश केरकर, ईशान सागवेकर, रिषभ खराडे, हार्दिक टिकम, रोहित वरक, आशिष चव्हाण यांचा समावेश होता. शिमगा खेळातून जमा झालेला निधी त्यांनी गावातील गरजू तरुण अविनाश धुरत याला भेट म्हणून दिला. त्यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
९०८८८
नाट्यमहोत्सवास
न्हावेलीत प्रतिसाद
सावंतवाडी ः न्हावेली येथील उत्कर्ष सेवा मंडळ, न्हावेली कट्टा कॉर्नर व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय नाट्यमहोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन दशावतार कलाकार भास्कर वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, स्वीय सहाय्यक गजानन नाटेकर, उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जनार्दन धाऊसकर, विश्राम नाईक, माजी सरपंच हरी वारंग, माजी उपसरपंच चंद्रकांत गावडे, कंझ्युमर्सचे व्हाईस चेअरमन रेडकर, माजी सरपंच शरद धाऊसकर, चंद्रकांत पार्सेकर, अर्जुन नाईक, चंद्रकांत नाईक, सोसायटीचे व्हाईस चेअरमन आनंद नाईक, लक्ष्मण धाऊसकर, आनंद आरोंदेकर, सागर धाऊसकर, ग्रामपंचायत सदस्य स्नेहा पार्सेकर, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पार्सेकर तसेच मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.