कबुलायतदार प्रश्नाबाबत केसरकरांना मांडला खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबुलायतदार प्रश्नाबाबत केसरकरांना मांडला खेळ
कबुलायतदार प्रश्नाबाबत केसरकरांना मांडला खेळ

कबुलायतदार प्रश्नाबाबत केसरकरांना मांडला खेळ

sakal_logo
By

swt2326.jpg
90952
आंबोली : उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी एकत्र येत कबुलायतदार गावकर प्रश्नाबाबत भूमिका मांडली.

कबुलायतदार प्रश्नाबाबत
केसरकरांनी मांडला खेळ
आंबोलीत टीकाः ठाकरे गट
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २३ : आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्नी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी फसवणूक करून या प्रश्नाचा खेळ मांडला आहे. गेली १३ वर्षे खोटे बोलून इथल्या जमिनीची विल्हेवाट लावण्यास तेच जबाबदार आहेत, असा आरोप करत त्यांच्या भूमिकेचा निषेध येथील उद्धव ठाकरे शिवसेनेने केला. केसरकर यांनी वेळीच प्रश्न सोडवला असता, तर इथली शेकडो एकर जमीन वनखात्याला गेली नसती, असा आरोपही या गटाने आज येथे पत्रकारांशी बोलताना केला.
कबुलायतदार गावकर प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे श्री. केसरकर यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने भूमिका मांडली. यावेळी विभागीय अध्यक्ष बबन गावडे, बुधाजी पाताडे, प्रकाश गुरव, काशिराम राऊत, सुनील राऊत, डुबा राऊत, नारायण कोरगावकर, अनिल चव्हाण, रुपा गावडे (फौजदारवाडी), दादा कर्पे, संजय पडते, संतोष पडते, लक्ष्मण पटकारे आदी उपस्थित होते. त्यांनी केसरकर यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले की, केसरकर यांनी आतापर्यंत ५० वेळा हा प्रश्न सोडवल्याचे जाहीर केले. आंबोली माझे दुसरे घर असे भावनिक आवाहन करून लोकांची दिशाभूल केली. प्रत्यक्षात हा प्रश्न सुटला नाही. येथील रोजगाराबाबतही त्यांनी अनेक घोषणा केल्या; पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. त्यांची ही भूमिका लोकांना आता कळून चुकली आहे, असे सांगून त्यांच्या भूमिकेचा या गटातर्फे निषेध करण्यात आला.