चिपळूण-जिल्ह्यात पवित्र रमजानला आजपासून सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-जिल्ह्यात पवित्र रमजानला आजपासून सुरवात
चिपळूण-जिल्ह्यात पवित्र रमजानला आजपासून सुरवात

चिपळूण-जिल्ह्यात पवित्र रमजानला आजपासून सुरवात

sakal_logo
By

जिल्ह्यात पवित्र रमजानला आजपासून सुरवात
चिपळूण, ता. २३ : रमजानच्या चंद्राचे गुरुवारी (ता. २३) संध्याकाळी दर्शन झाल्याने शुक्रवारी (ता.२४) पहिला रोजा राहणार आहे. चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी फोन, सोशल मिडियावरुन रमजान आणि चांद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.
चंद्रदर्शन झाल्याने आजपासून रात्री विशेष नमाज ‘तरावीह’ला सुरवात झाली. रमजानमध्ये ‘तरावीह’ची विशेष नमाज रात्रीच्या ‘ईशा’च्या नमाजनंतर अदा केली जाते. विशेष ‘नमाज तरावीह’मध्ये महिनाभर कुराण पठण केले जात असल्याने सर्व मशिदीत गर्दी असते. रमजानच्या निमित्ताने आजपासून बाजारपेठेत खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. सहरी आणि रोजा ईफ्तार साठी लागणाऱ्या वस्तू खरेदी केल्या जात होत्या. खजूर आणि फळांच्या खरेदीला प्रथम प्राधान्य दिले जात होते. सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे संध्याकाळी सरबताला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे विविध प्रकारचे सरबत आणि ज्यूस विक्रीला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक मुस्लिम मोहल्यांमध्ये मशिदीवर विद्युत रोषणाई करून रमजानचे स्वागत करण्यात आले. छोटे रोजेदार यांना रमजानचे जास्त आकर्षण असते. त्यामुळे तेही उद्यापासून रोजे धरणार आहेत.