कबड़्डी स्पर्धेत ''पंचक्रोशी फोंडा'' विजेता

कबड़्डी स्पर्धेत ''पंचक्रोशी फोंडा'' विजेता

swt२३२९.jpg

मालवणः जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील पुरुष गटातील विजेता पंचक्रोशी फोंडा संघ.

swt२३३०.jpg
९०९९३
निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेतील विजेता मालवण कबड्डी संघ.

कबड़्डी स्पर्धेत ‘पंचक्रोशी फोंडा’ विजेता
मालवणातील स्पर्धाः महिलांमध्ये मालवण संघाची बाजी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्रमंडळ, डांगमोडे यांच्यावतीने मसुरे-डांगमोडे येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये पंचक्रोशी फोंडा संघाने लक्ष्मीनारायण वालावल संघाचा २३-४ असा पराभव करून १९ गुणांनी विजय संपादन केला. महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धेत मालवण महिला संघाने देवगड महिला संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण १८ संघांनी सहभाग दर्शविला. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक कलेश्वर नेरुळ कबड्डी संघ व चतुर्थ क्रमांक रेवतळे मालवण कबड्डी संघाने पटकावला. विजेत्या एक ते चार संघांना ७ हजार रुपये, ४ हजार रुपये, प्रत्येकी १५०० रुपये आणि शिवाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ भव्य चषक देण्यात आले. या स्पर्धेमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून योगेश घाडी, उत्कृष्ट पकड दीपक काळे, उत्कृष्ट चढाई सुयोग राजापकर व शिस्तबद्ध संघ म्हणून शिवम प्रतिष्ठान सावंतवाडी संघाची निवड करण्यात आली. या सर्वांना रोख रुपये आणि चषक प्रदान करण्यात आले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून हेमंत गावडे, प्रथमेश नाईक, दाजी रेडकर, नितीन हडकर, हेमंत तावडे, महेश सावंत, राजेश गोवेकर आणि गुणलेखक म्हणून महेश सावंत, राजेश गोवेकर यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण समारंभास माजी पंचायत समिती उपसभापती छोटू ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, बिळवस सरपंच मानसी पालव, माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, बाळप्रकाश ठाकूर, राजा ठाकूर, महेश ठाकूर, सोमा ठाकूर, हरी ठाकूर, परशुराम चव्हाण, ओमकार ठाकूर, किशोर ठाकूर, कमलेश ठाकूर, बुधाजी ठाकूर, प्रकाश ठाकूर, रमेश ठाकूर, मंगेश ठाकूर, कल्पना ठाकूर, परेश ठाकूर, बापू ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, कृष्णा ठाकूर, गार्गी चव्हाण, अनिल ठाकूर, पूजा ठाकूर, पंकज ठाकूर, मंगेश चव्हाण, परशुराम ठाकूर, बाबू ठाकूर, अनिल ठाकूर, अमित ठाकूर, संचित ठाकूर, विकास ठाकूर, संकेत ठाकूर, परशुराम चव्हाण आणि नवतरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, पंकज वर्दम, बाबू आंगणे, पिंट्या गावकर, बाळा आंगणे आणि डांगमोडे ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळ ठाकूर यांनी, दत्तप्रसाद पेडणेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com