कबुलायतदार प्रश्नासाठी श्रेयवाद नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबुलायतदार प्रश्नासाठी श्रेयवाद नको
कबुलायतदार प्रश्नासाठी श्रेयवाद नको

कबुलायतदार प्रश्नासाठी श्रेयवाद नको

sakal_logo
By

swt२३३१.jpg
९०९९८
सावंतवा़डीः पत्रकार परिषदेत बोलताना राजन तेली. यावेळी संजू परब, मनोज नाईक.

कबुलायतदार प्रश्नासाठी श्रेयवाद नको
राजन तेलीः जिल्हाध्यक्षपदातून मुक्ततेची पक्षाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः आंबोली-गेळे येथील अनेक भेडसावणारा कबुलायतदार गावकर प्रश्न सुटल्यात जमा आहे. त्यामुळे आता कोणी श्रेयासाठी वाद नको, तर तो प्रश्न सुटण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया. मल्टिस्पेशालिटीसाठी जागा उपलब्ध होत नसेल तर अनेक पर्यायी जागा आहेत. त्यासाठी नागरिकांची एकत्र बैठक घेऊया, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता मला पक्ष संघटना मजबूत करायची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात माझ्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी नको, अशी भूमिका मी पक्षाकडे मांडली आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. श्री. तेली यांनी आज येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
श्री. तेली पुढे म्हणाले, "शिंदे-फडणवीस शासनाच्या माध्यमातून विविध हेडमधून जिल्ह्यासाठी तब्बल तीन हजार कोटीहून अधिक रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता याचा फायदा जिल्ह्याच्या विकासासाठी होणार आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता मला पक्ष संघटना मजबूत करायची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी नको, अशी भूमिका मी पक्षाकडे मांडली आहे. त्यामुळे मी आता जिल्हाध्यक्ष पदावरून दूर जाणार आहे. संघटनेतील नियमाप्रमाणे काही वर्षांनी हा बदल निश्चित आहे." सावंतवाडी विधानसभेत तुम्ही इच्छुक आहात का, असा प्रश्न केला असता, मी या ठिकाणी संघटना बांधत आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बॅंक संचालक महेश सारंग आणि मनोज नाईक हे सुद्धा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत; परंतु पक्षात इच्छा व्यक्त करून काही मिळत नाही, असे सांगून या चर्चेला पूर्णविराम दिला. भविष्यात पक्ष संघटना मजबूत करायची असून त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत आणि या ठिकाणी शतप्रतिशत भाजप करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. तेली पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजप युती सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तब्बल २७८५.८० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्वदेश दर्शन, प्रादेशिक पर्यटन व अन्य योजनांचा निधी मिळून ३ हजार कोटींपेक्षा जास्तीचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला युती शासनाच्या काळात खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो. या निधीतून होत असलेली कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी पालकमंत्र्यांना आवाहन करणार आहे. मल्टिस्पेशालिटीबाबत मंत्री तानाजी सावंत भेट घेतली हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. स्थानिक आमदारांनीही प्रयत्न करावेत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
खनिकर्म विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात आलेल्या तसेच आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयास देण्यात आलेल्या काही रुग्णवाहिका चालकांअभावी धूळखात पडल्याकडे तेली यांचे लक्ष वेधण्यात आले. तेली यांनी शल्यचिकित्सकांकडून माहिती जाणून घेतली. याबाबत रोजंदारी (डेली वेजिस) तत्वावर चालकांची भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती शल्य चिकित्सकांनी दिली. १०८ रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्यास हा गंभीर विषय असून आरोग्य प्रशासनाकडून त्यात हयगय झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे तेली यांनी स्पष्ट केले.
....................