ग्रामीण स्पर्धांमुळे खेळाडूंना व्यासपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण स्पर्धांमुळे खेळाडूंना व्यासपीठ
ग्रामीण स्पर्धांमुळे खेळाडूंना व्यासपीठ

ग्रामीण स्पर्धांमुळे खेळाडूंना व्यासपीठ

sakal_logo
By

swt२४२.jpg
91083
कुडाळः शिवसेनेच्यावतीने आयोजित निमंत्रितांच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करताना अमरसेन सावंत. सोबत आमदार वैभव नाईक, संजय पडते, नागेंद्र परब, नगराध्यक्षा आफरीन करोल, मंदार शिरसाट आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

ग्रामीण स्पर्धांमुळे खेळाडूंना व्यासपीठ
आमदार वैभव नाईकः कुडाळमध्ये कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ः ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून प्रो-कबड्डी स्पर्धेसाठी खेळाडू तयार होऊ शकतात. येथील तहसीलदार मैदानावर पुढील काळात होणाऱ्या कबड्डी स्पर्धा मॅटवर होतील, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
आमदार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला येथील तहसीलदार कार्यालयानजीक क्रीडा संकुल मैदानावर सुरुवात झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, नागेंद्र परब, आफरीन करोल, मंदार शिरसाट, अमरसेन सावंत, श्रेया परब, राजन नाईक, रुपेश पावस्कर, अतुल बंगे, बबन बोभाटे, राजू गवंडे, सचिन काळप, योगेश धुरी, कृष्णा धुरी, उदय मांजरेकर, किरण शिंदे, श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, अक्षता खटावकर, ज्योती दळवी, अभय शिरसाट, बाळा कोरगावकर, शेखर गावडे, संतोष शिरसाट, रुपेश पावस्कर, संदीप महाडेश्वर, बाबी गुरव, गोट्या चव्हाण, निरीक्षक मार्टीन अल्मेडा, पंच राजेश सिंगनाथ, दाजी रेडकर, मधुकर पाटकर, जयेश परब, प्रथमेश नाईक, अमित गंगावणे, किशोर पाताडे, सागर पांगुळ, प्रीतम वालावलकर, प्रथमेश सावंत, कृष्णा सावंत, भाऊ पाटणकर उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, "कुडाळ-मालवण तालुक्यात मागील ७ ते ८ वर्षे कबड्डी स्पर्धा होत आहे. यावर्षी या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वाधिक बक्षिसे घोषित केली आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. सध्या ग्रामीण भागात सुध्दा कबड्डी स्पर्धा होत असून त्याला प्रोत्साहन दिले जाईल. अशा स्पर्धांच्या माध्यमातून प्रो-कबड्डी स्पर्धेसाठी खेळाडू तयार होऊ शकतात. उद्धव ठाकरे यांच्याशी सदैव एकनिष्ठ राहणार असून कुडाळ शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू."
जिल्हाप्रमुख पडते यांनी स्पर्धेला शुभेच्छा देताना आमदार नाईक यांनी नेहमीच कुडाळ, मालवण तालुक्यांत क्रीडा स्पर्धांना प्राधान्य दिले आहे. या भागात अनेक विकासकामे त्यांच्या माध्यमातून झाली. त्यामुळेच ते या मतदारसंघातून पुन्हा हॅटट्रिक साधतील, असा विश्वास व्यक्त केला. या स्पर्धेसाठी प्रथम ३५ हजार रुपये आणि चषक, द्वितीय २० हजार रुपये आणि चषक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी ७ हजार रुपये व चषक तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, चढाई आणि पकड अशी पारितोषिके आहेत.