देवगडात स्वच्छता प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात स्वच्छता प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित
देवगडात स्वच्छता प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित

देवगडात स्वच्छता प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित

sakal_logo
By

swt2410.jpg
91100
जामसंडेः येथे टाकण्यात आलेला कचरा. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगडात स्वच्छता प्रश्न
पुन्हा एकदा अधोरेखित
उघड्यावर कचराः घंटागाडी असूनही अस्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ः एकीकडे देवगड जामसंडे शहरात नगरपंचायतीच्यावतीने घंटागाडी फिरवून कचरा गोळा करण्याचे काम होत असले तरी अजूनही काही भागात उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे. रस्त्याकडेला, अडचणीच्या ठिकाणी तसेच कोरड्या ओहोळाच्या भागात कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्‍न पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
देवगड जामसंडे नगरपंचायत झाल्यानंतर शहराच्या विविध भागांत घंटागाडी फिरवून ओला-सुका कचरा गोळा केला जातो. यासाठी नागरिकांना आवाहन केले जाते. शहरातील अनेकजण आपला कचरा घंटागाडीवर देताना दिसतात. शहराच्या रस्त्याकडेला असलेला कचरा, गवत याची स्वच्छता केली जाते. रस्त्याकडेला असलेला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते. पावसाळ्यात वाढलेले रस्त्याकडेचे गवतही कापून घेतले जाते. अलीकडे घरपट्टीमधून घनकचरा शुल्कही आकारणी केली जात आहे; मात्र शहराच्या विविध भागात अजूनही रस्त्याकडेला कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. जामसंडे भागात कोरड्या ओहोळात कचरा टाकला असल्याचे चित्र आहे. जोराचा वारा आणि भटकी कुत्री यामुळे कचरा इतस्ततः पसरलेला दिसतो. यामुळे परिसर अस्वच्छ भासत आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नगरपंचायतीच्यावतीने शहरात घंटागाडी फिरवली जात असताना शहरात उघड्यावर कचरा टाकण्याने अस्वच्छता निर्माण होऊ शकते, याचेही भान जपण्याची गरज आहे. शहराच्या स्वच्छतेमधून नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यक आहे. त्यामुळे याकडे लक्ष कोण देणार, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे.