दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

दापोलीत दिवसभर
उन्हाचे चटके
दाभोळ ः दापोलीत सध्या रात्रीच्या सुमारास गारवा जाणवत असला तरी दिवसभर उन्हाचे चटके दापोलीकरांना सोसावे लागत आहेत.
हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्याप्रमाणे ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस पडला नाही त्यामुळे वातावरणात उष्मा जाणवत आहे. दिवसभर दापोलीकरांना एसी, पंखा यांचा आधार घ्यावा लागत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे बागायतदारदेखील चिंतेत असून, दिवसभर हवेतील उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या दापोलीकरांना रात्री उष्णतेपासून दिलासा मिळत आहे.

आमदार गोगावले यांना
विकास समितीचे निवेदन
खेड ः कोकण विकास समिती शिष्टमंडळाने कोकणातील विविध प्रश्नी आमदार भरत गोगावले यांची मुंबई येथे भेट घेत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. आमदार गोगावले यांनी प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्यादृष्टीने लक्ष घालण्याचे आश्वासनही दिले. रायगड जिल्ह्यातील दासगाव जेटी-गोठेदरम्यान सावित्री नदीवर पुलाची निर्मिती करून वीर-दासगाव जेट्टी-गोठे-करंजाडी हा नदी रस्ता तयार व्हावा या विषयावरही चर्चा झाली. याबाबत कोकण विकास समितीकडून सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली. अभियंता यांची बैठक लावणार असल्याचे आश्वासनही आमदार गोगावले यांनी दिले. या प्रसंगी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर, मनोज सुर्वे, एकनाथ सुकून, ॲड. विशाल गोलांबडे, समीर रेवाळे, राजेश जाधव, शांताराम सुर्वे, महेश चव्हाण, नरेंद्र दरेकर आदी उपस्थित होते.

पाजपंढरी एसटीची
वेळ बदलण्याची मागणी
दाभोळ ः दापोली येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयात हर्णै, पाजपंढरी येथून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात; मात्र बसची वेळ त्यांच्या सोयीची नसल्याने महाविद्यालयामध्ये येण्यास विद्यार्थ्यांना उशीर होतो. सध्या परीक्षेचा कालावधी सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार पाजपंढरी येथून सुटणाऱ्या बसची वेळ सकाळी 10 वा. करावी अशी मागणी होती. त्यासाठी प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी आगारप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी यांची संयुक्त सभा बोलावली होती. या सभेत विद्यार्थ्यांनी बसच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी केली. आगारप्रमुख यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन विद्यार्थी मागणीप्रमाणे पाजपंढरी ते दापोली बसची वेळ सकाळी 10 वा. केली आहे. या सभेला आगारप्रमुख रेश्मा मधाळे, प्रा. डॉ. सुरेश निंबाळकर, प्रा. विश्वंभर कमळकर, नंदकुमार जोशी, समृद्धी चोगले व संघवी पावसे हे विद्यार्थी उपस्थित होते.