बेकायदेशीर एलईडीविरुद्ध मत्स्यखात्याची मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदेशीर एलईडीविरुद्ध मत्स्यखात्याची मोहीम
बेकायदेशीर एलईडीविरुद्ध मत्स्यखात्याची मोहीम

बेकायदेशीर एलईडीविरुद्ध मत्स्यखात्याची मोहीम

sakal_logo
By

-rat२४p३२.jpg-
९११५७
रत्नागिरी ः एलईडीद्वारे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकेवर मत्स्यखात्याने कारवाई केली.
-rat२४p३३.jpg-
९११५८
सलग तीन दिवस करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे १२ लाखाचे एलईडी आणि जनरेटर मत्स्यविभागाने जप्त केले.
-
बेकायदेशीर एलईडीविरुद्ध मत्स्य खात्याची मोहीम

सलग ३ दिवस कारवाई; बारा लाखाचे जनरेटर, एलईडी जप्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः बेकायदेशीर एलईडीविरुद्ध (प्रकाशझोतातील मासेमारी) सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाने जोरदार मोहीम उघडली आहे. खोल समुद्रात सलग तीन दिवस थरारक पाठलाग करून तिघांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जनरेटर, एलईडी असे सुमारे १२ लाखाचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई अशी पुढे सुरू राहणार असल्याचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त व्ही. एम. भादुले यांनी सांगितले.
काही दिवासांपासून केंद्र शासनाने बंदी घातलेल्या एलईडीद्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू असल्याची माहिती होती. त्यानुसार सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून २१ तारखेपासून सलग तीन दिवस एलईडीविरुद्ध मोहीम हाती घेतली. २१ मार्चला मासेमारी नौकेवर जनरेटर चढवणाऱ्या क्रेन आणि जनरेटर वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्वतः सहाय्यक आयुक्त भादुले यांनी पाठलाग करून कारवाई केली. यामध्ये दोन्ही वाहने जनरेटरसह ताब्यात घेण्यात आली. २२ मार्चला मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जे. डी. सावंत व सहाय्यक आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी रात्रीच्यावेळी ११ नॉटिकल माईलमध्ये खोल समुद्रात एलईडी नौकेवर कारवाई करण्यात आली. या नौकेवरील सर्व साधनसामुग्री जप्त करून नौका स्थानबद्ध करण्यात आली. २३ मार्चला बंदरात छुप्या पद्धतीने उभ्या असलेल्या एलईडी व जनरेटर असणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यात आली. या नौकेवरील सर्व साधनसामुग्री जप्त करून नौका ताब्यात घेण्यात आली. सलग तीन दिवस तीन वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करून अंदाजे दहा ते बारा लाख रुपयाची सामग्री जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य प्रशिक्षण अधिकारी, मत्स्यविकास अधिकारी व सर्व अंमलबजावणी अधिकारी रत्नागिरी यांनी संयुक्तरित्या केली.