
फोटोसंक्षिप्त-साळगावात प्रकटदिनी गुरांना हिरवा चारा
फोटोसंक्षिप्त
९११७६
साळगावात प्रकटदिनी
गुरांना हिरवा चारा
कुडाळ ः साळगाव येथील वेदपाठशाळेत श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त गुराना (गायीना व वासरांना) हिरवा चारा देण्यात आला. बारा वासरांसाठी झारापचे आदर्श शेतकरी शरद धुरी यांनी मक्याचा चारा कापून दिला. याचप्रमाणे वेदपाठशाळेत शिकणाऱ्या ब्राह्मणांना गुळ, बटाटे, नारळ, खोबरे, तुरडाळ असा शिधा देण्यात आला. कोणाला आपले वाढदिवस साजरे करायचे असतील, तर त्यांनी मुक्या जनावरांना चारा व खाऊच्या स्वरूपात वस्तू देव्यात, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजू तेंडोलकर यांनी केले आहे. स्वामी प्रकटदिनी भटजी अक्षय पत्की, गिरीश मुंडले, विराज मुंडले, राजू तेंडोलकर उपस्थित होते.
९११७७
कुडाळात युवा मोर्चाच्या
राहुल गांधींविरोधात घोषणा
कुडाळ ः ''मोदी'' या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आज तालुका युवा भाजपा मोर्चाने विविध घोषणा देत आंदोलन केले. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, तालुकाध्यक्ष रुपेश कानडे यांच्या नेतृत्वाखाली विविध घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दादा साईल, जयेश चिंचळकर, निखिल कांदळगावकर, सौरभ ताम्हणकर, राकेश कांदे, प्रसाद पाटकर, ललित चव्हाण, मंदार पडवळ, सुमित सावंत, राकेश सावंत, तन्मय वालावलकर, शुभम लुडबे, भूषण आंगचेकर, हितेश धुरी, दशरथ गडेकर, हेमंत गावडे, नारायण कुंभार, सुश्मित बांबुळकर, अनंतराज पाटकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
पानवळ-बांदा येथे
गुरुवारी रामनवमी
बांदा ः प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम पंचायतन मंदिर, पानवळ-बांदा येथे ३० मार्चला रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता नित्यपूजन आणि अभिषेक, १० वाजता सदाशिव पाटील यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता श्री रामजन्म सोहळा, त्यानंतर महाप्रसाद, दुपारी २ ते ३ वाजता भक्तिसंगीत (प्रदीप चिटणीस, मुंबई), ३.३० ते सायंकाळी ५ पर्यंत प. पू. भक्तराज महाराज भजन मंडळ, पर्वरी यांचे भजन, सायंकाळी ५ ते ५.३० श्रीरामरक्षा आवर्तन, श्रीराम जप (सामूहिक), सायंकाळी ६ वाजता शेखर पणशीकर यांचे ''गीतरामायण'', रात्री ८ वाजता स्थानिक ग्रामस्थांच्याचे भजन होणार आहे. भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प. पू. दास (रघुवीर) महाराज यांनी केले आहे.