
कुडाळमध्ये भाजप युवा मोर्चातर्फे राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणा
९११७७
कुडाळमध्ये भाजप युवा मोर्चातर्फे
राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणा
कुडाळ ः ‘मोदी’ या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आज तालुका युवा भाजप मोर्चाने विविध घोषणा देत आंदोलन केले. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, तालुकाध्यक्ष रुपेश कानडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दादा साईल, जयेश चिंचळकर, निखिल कांदळगावकर, सौरभ ताम्हणकर, राकेश कांदे, प्रसाद पाटकर, ललित चव्हाण, मंदार पडवळ, सुमित सावंत, राकेश सावंत, तन्मय वालावलकर, शुभम लुडबे, भूषण आंगचेकर, हितेश धुरी, दशरथ गडेकर, हेमंत गावडे, नारायण कुंभार, सुश्मित बांबुळकर, अनंतराज पाटकर आदी उपस्थित होते.
--
91257
दोडामार्ग ः येथे अपघातात दुकानात घुसलेला डंपर.
ब्रेक निकामी झाल्याने डंपर दुकानात
दोडामार्ग ः भरधाव वेगात असलेल्या डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने डंपर थेट दुकानात घुसला. दोडामार्ग-बांदा असा प्रवास करीत असताना हा अपघात घडला. यात दुकानाच्या बाहेर ठेवलेले साहित्य तसेच डंपरच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. येथील रुग्णालयाजवळ आज ही घटना घडली. दोडामार्गहुन बांद्याच्या दिशेने एक रिकामी डंपर जात होता. येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ आला असता डंपरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून डंपर थेट सिद्धेश्वर ट्रेडर्स या दुकानात घुसला. दुकानासमोर ठेवलेले सिमेंटचे दरवाजे, खांब, खिडक्या तसेच अन्य वस्तूंवर डंपरची धडक बसल्याने नासधूस झाली. डंपरच्या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले. दोन्ही बाजूंनी हे प्रकरण सामंजस्याने मिटविण्यात आले.
..............
‘समृद्धी पांचभौतिक’चे कुडाळात आज उद्घाटन
कुडाळ ः येथील सुमेध लॅबचे डॉ. संजय सावंत व डॉ. उज्ज्वला सावंत यांच्या समृद्धी पांचभौतिक आयुर्वेद चिकित्सालय या नवीन क्लिनिकचा प्रारंभ डी-१५, मेहनील प्लाझा, नेरूर रोड, बँक ऑफ इंडिया जवळ, कुडाळ येथे उद्या (ता. २५) सायंकाळी सहाला होणार आहे. याचा प्रारंभ डॉ. सुबोधन कशाळीकर (सावंतवाडी) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष आफ्रिन करोल, डॉ. सायली प्रभू, नगरसेविका संध्या तेरसे, अक्षता खटावकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, मेहनील प्लाझा हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोविंद शिरसाट, सचिव गणपत तेर्से, कुडाळ इनरव्हील अध्यक्ष वैशाली कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. उज्ज्वला व डॉ. संजय सावंत यांनी केले आहे.