
जलजीवन जागृतीसाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण
जलजीवन जागृतीसाठी प्रशिक्षण
रत्नागिरी, ता. २५ ः जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी व जे. पी. एस. फाउंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने २३ व २४ मार्चला ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम झाले. प्रशिक्षणाचे उद्घाटन नंदिनी घाणेकर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा याच्या हस्ते जलकुभांचे पूजन करून करण्यात आले.
जलजीवन मिशन कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत असून २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांला वैयक्तीक नळजोडणीद्वारे ५५ लिटर प्रतिमानसी गुणवत्तापूर्वक पाणीपुरवठा करणे हे उद्दिष्ट आहे. तसेच या कार्यक्रमांतर्गत ग्रामस्तरावरील भागधारकांच्या जबाबदाऱ्या व भूमिका स्पष्ट होण्याच्या अनुषंगाने या प्रशिक्षणाला सरपंच, उपसरपंच, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे प्रतिनिधी, ग्रामसेवक, एमएसआरएलएमच्या प्रभागनिहाय अध्यक्षा व जलसुक्षक हे उपिस्थत होते. या वेळी घाणेकर यांनी नळपाणी पुरवठा योजना कार्यन्वयन, संचालन, देखभाल व दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीची महत्वाची भूमिका आहे. यामध्ये सर्वांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच राहुल देसाई यांनी गावस्तरावरील विविध घटकांची भूमिका वृद्धिंगत होण्याच्यादृष्टीने हे प्रशिक्षण महत्वाचे असून, लोकवर्गणीबाबत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याबाबत आवाहन केले. या वेळी लोकवर्गणीबाबत माहिती दर्शवणारे फलकाचे अनावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणाला मंदार साठे-युनिसेफ मुंबई, संदीप अध्यापक, पाडुरंग मिसाळ, संदीप शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मयुरी पाटील, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, परिविक्षाधीन अधिकारी विवेक गुंड, योगेश कदम, अभिजित कांबळे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व सल्लागार हे उपस्थित होते.
-