
सुर्याजी खानोलकर यांच्या तैलचित्राचे मळगावात अनावरण
91328
मळगाव ः प्रथम सरपंच सुर्याजी खानोलकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करताना महेश खानोलकर. शेजारी सरपंच स्नेहल जामदार, हनुमंत पेडणेकर आदी.
सुर्याजी खानोलकर यांच्या
तैलचित्राचे अनावरण
सावंतवाडी, ता. २५ : मळगाव ग्रामपंचायतची स्थापना १९५७ मध्ये झाली. त्यावेळी प्रथम सरपंचपदाचा मान लाभलेले (कै.) सुर्याजी सखाराम खानोलकर यांच्या तैलचित्राचे अनावरण त्यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते महेश खानोलकर यांच्या हस्ते तर मळगाव सरपंच सौ. स्नेहल जामदार व उपसरपंच श्री हनुमंत पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
त्यानंतर मळगावच्या नूतन ग्रामसचिवालयात हे तैलचित्र सन्मानपूर्वक लावण्यात आले. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, माजी सरपंच विजयानंद नाईक, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, लाडू जाधव, सदस्या निकिता राऊळ, निकिता बुगडे, माजी सदस्य गुरुनाथ गावकर, माजी उपसरपंच काळोजी राऊळ, सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र सावंत, मनोहर राऊळ, सुभाष नाटेकर, चंद्रकांत जाधव, सुखदेव राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी महेश खानोलकर यांच्यासह गुरुनाथ गांवकर, चंद्रकांत जाधव, आनंद देवळी यांनी कै. सुर्याजी खानोलकर यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करीत विचार मांडले. (कै.) सुर्याजी खानोलकर तसेच माजी सरपंच (कै.) रमाकांत खानोलकर यांचे मळगावच्या विकासात असलेले योगदान यावेळी सर्वच वक्त्यांनी विषद केले. सरपंच स्नेहल जामदार यांनी स्वागत केले. उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी आभार मानले.