आज आई महाकाली देवीचा छबिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज आई महाकाली देवीचा छबिना
आज आई महाकाली देवीचा छबिना

आज आई महाकाली देवीचा छबिना

sakal_logo
By

-ratchl२५१.jpg ः
९१३२५
चिपळूण ः श्री सुकाई वरदायिनी महाकाली देवीच्या छबिन्यात अशी पालखी वाजतगाजत नाचवत नेली जाते.
-
पोफळीत आज आई महाकाली देवीचा छबिना

विविध कार्यक्रम ; सोमवारी शिंपणे उत्सव

चिपळूण, ता. २५ ः तालुक्यातील पोकळी येथे रविवारी (ता. २६) श्री सुकाई वरदायिनी महाकाली देवीचा छबिना होत आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिंपणे कार्यक्रम सोमवारी (ता. २७) सायंकाळी पोफळी पवारवाडी येथील सहाणेपासून सुरू होणार आहे.
या उत्सवासाठी गावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्ताने बंद असलेल्या घरातील नागरिक घरी येतात. त्यामुळे या उत्सावावेळी गावातील एकही घर बंद राहात नाही. तसेच प्रत्येक घरात मांसाहारी जेवण शिजवले जाते, हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. या निमित्ताने रविवारी रात्री ११ वाजता देव शृंगारून देवीची दिवटी पाजळली जाणार आहे. या निमित्त देवीची पालखी विद्युत रोषणाई व फुलांनी सजवण्यात आली आहे. परिसरातील ढोलताशाच्या गजरात पालखी नाचवण्यात येते. पोफळीनाका येथून मिरवणुकीला सुरवात होईल. यासाठी पोफळीनाका ते सहाणेपर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यानिमित्ताने पोफळीत हत्ती, अंबारी, विविध सोंगे, घोड्यांचा नाच यांच्यासह विविध देखावे साकारण्यात येणार आहेत. रविवारी रात्रभर आणि सोमवारी पहाटेपर्यंत छबिनाचा उत्साह कायम राहणार आहे. या वेळी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली जाते. शिरगांव कुंभार्ली पोफळी या ३ गावची पालखी आणि स्थानिक पालखी सहभागी होणार आहे. शिंपणे कार्यक्रम सोमवारी सायंकाळी चारनंतर सुरू होणार आहे. ग्रामस्थांनी आई महाकाली देवीच्या छबीन्यास उपस्थित राहावे, असे आवाहन पोफळी ग्रामस्थांनी केले आहे.