क्राईम एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम एकत्रित
क्राईम एकत्रित

क्राईम एकत्रित

sakal_logo
By

भडगावमधील जुगारप्रकरणी एकावर गुन्हा

खेड ः तालुक्यातील भडगाव-शेवरवाडी येथे बेकायदेशीरपणा जुगार चालवण्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील दिलीप खेडेकर (रा. शेवरवाडी, भडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. तो आपल्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारत जुगार चालवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून रंगेहाथ पकडले. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर जायभाय यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
-
लवेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा
खेड ः तालुक्यातील लवेल मधलीवाडी येथे मटका जुगार खेळणाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यात एकाकडून ४ हजार १३७ रुपयांची रोकड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी नीलेश आत्माराम आंबरे (रा. लवेल) यांच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी योगेश नार्वेकर यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
-
भेलसईत आग प्रकरणी एकावर गुन्हा

खेड ः तालुक्यातील धामणंद पंधरागाव भेलसई-रोहिदासवाडी येथील घराच्या कंपाऊंडमधील जळाऊ लाकडे व बांबूचे बेट व फणसाच्या झाडाला आग लावून ५५ हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील मारूती कदम (रा. रोहिदासवाडी, भेलसई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत रामदास कदम यांनी तक्रार दाखल केली आहे. बाचाबाचीचा राग मनात धरून आग लावून ५५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------
खेडमध्ये काँग्रेसचे २८ ला निदर्शने

खेड ः कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात झालेल्या अन्यायाबाबत होत असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर येथील काँग्रेस आक्रमक झाले आहे. मंगळवारी (ता. २८) भरणे नाका येथे आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत. राहुल गांधी यांची रद्द झालेली खासदारकी यामुळे सत्ताधाऱ्याकडून देशातील लोकशाहीची हत्त्या केली जात आहे. या दडपशाहीच्या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन व निदर्शने करण्यात येणार असल्याचे निवेदन तालुकाध्यक्ष गौस खतीब व कार्यकर्ते यांनी येथील पोलिस ठाण्यात दिले आहे.