समाजात वाद पेटवण्याचा प्रयत्न दुर्दैवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजात वाद पेटवण्याचा प्रयत्न दुर्दैवी
समाजात वाद पेटवण्याचा प्रयत्न दुर्दैवी

समाजात वाद पेटवण्याचा प्रयत्न दुर्दैवी

sakal_logo
By

rat२५p९.jpg
९१३०६
खेडः पत्रकार परिषदेत बोलताना कुणबी शिवसेवा संघ खेडचे अध्यक्ष वसंत शिगण. सोबत शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी उप सभापती शांताराम म्हसकर.
------------------
समाजात वाद पेटवण्याचा प्रयत्न दुर्दैवी
वसंत शिगण; काही लोकप्रतिनिधींकडून तेढ निर्माण करण्याचे काम
खेड, ता. २५ः महाराष्ट्रात कुठेच समाजात वाद पेटवला जात नाही; पण दुर्दैवाने तसा प्रयत्न कोकणात काही लोकांकडून येथे होताना दिसतो आहे, अशी खंत कुणबी शिवसेवा संघ खेडचे अध्यक्ष वसंत शिगण यांनी येथे व्यक्त केली. शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी भरणे येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या परिषदेला शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, सचिव शांताराम म्हसकर, कुणबी शिवसेवा संघ खेडचे सचिव तथा माजी उपसभापती रामचंद्र आईनकर, खजिनदार महेश जगदाळे, माजी खेड पंचायत समिती सभापती व सेवा संघाचे उपाध्यक्ष शांताराम चिनकटे, भरणे शिवसेना विभागप्रमुख प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.
शिगण म्हणाले, महाराष्ट्रामध्ये कुणबी आणि मराठा असा वाद कुठेच पेटवला जात नाही; मात्र कुणबी समाजामधील काही राजकीय नेते झोपताना पण जॅकेट घालून झोपत आहेत अन् आमदारकीची राजकीय स्वप्न पाहत आहेत. वैयक्तीक स्वार्थापोटी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक या लोकप्रतिनिधींकडून होत आहे. यामागचा खरा सुत्रधार कोण आहे याची जाणीव समाजाला आहे. यापूर्वी जिल्ह्यामध्ये ६ कुणबी समाजाचे आमदार होते त्या वेळी कुणबी समाजाच्या वाड्यांचा किती विकास झाला ते सांगा? अनंत गीते ६ वेळा खासदार म्हणून निवडून आले व ४ वेळा केंद्रीय मंत्री झाले. कुणबी समाजाचा किती विकास झाला ते प्रथम सांगा. अनंत गीतेच्या लोकसभा मतदार संघात ७० टक्के कुणबी समाज असतानादेखील यांचा ३ टक्केदेखील समाज नाही, असे सुनील तटकरे कसे निवडून येतात ते सांगा. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामध्ये ७० टक्के कुणबी समाज असताना ४० हजारचा लीड सुनील तटकरे यांना कसा मिळतो? दापोली येथील काही कुणबी समाजाच्या नेत्यांनी अनंत गीते यांना पाडण्यासाठी तटकरे यांचे उघडपणे काम केले. मग कुणबी समाजानेच अनंत गीते यांना का पाडलं?
शिवसेना तालुकाप्रमुख धाडवे म्हणाले, योगेश कदम यांच्यासारखा तरुण तडफदार, सुशिक्षित व सौम्य स्वभावाने सर्व समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन कुणबी समाजाच्या वाडीवस्तीचा विकास करणारा आमदार नेमका का नको ते कुणबी समाजाच्या नावाने बातम्या देणाऱ्यांनी सांगावे आणि मागील २० वर्षापासून दापोली मतदार संघामधील कुणबी समाजाची सामाजिक बांधिलकी सोडून फक्त शिवसेनेच्या आमदाराला पाडण्याचे कुणबी समाजाचे जातीय राजकारण का केले जाते? कुणबी समाज आता अशिक्षित राहिला नाही. समाजाच्या नावाने ब्लॅकमेलिंग करून समाजाची कुठलीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कोणीही साथ देणार नाही.