
आमदार नाईक यांच्यासाठी स्वयंभू मंदिरात महारुद्र
91374
कणकवली : श्री स्वयंभू मंदिरात महारूद्र झाल्यानंतर ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांना शुभेच्छा दिल्या.
आमदार नाईक यांच्यासाठी
स्वयंभू मंदिरात महारुद्र
कणकवली, ता.२५ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरात आज महारूद्र करण्यात आला. येथील शिवसेनेतर्फे हा कार्यक्रम झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी आमदार नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मयुरी नाईक, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, नगरसेवक कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, सचिन आचरेकर, तेजस राणे, प्रमोद मसुरकर, रुपेश आमडोसकर, राजू राठोड, आदित्य सापळे, सोहम वाळके, संतोष राणे, बबन राणे, सदा राणे, अंबाजी राणे, मंगेश राणे, महेश राणे, परेश बागवे, जितेंद्र राणे, प्रतीक रासम, योगेश मुंज, श्रवण राणे, सूर्याजी राणे, राजू गुरव, उदय सर्पे, शशिकांत तावडे आदी उपस्थित होते.