फणसवाडीत रंगला जाखडी नृत्याचा आविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फणसवाडीत रंगला जाखडी नृत्याचा आविष्कार
फणसवाडीत रंगला जाखडी नृत्याचा आविष्कार

फणसवाडीत रंगला जाखडी नृत्याचा आविष्कार

sakal_logo
By

-rat२६p२०.jpg-
९१४८०
तुळशी : भैरवनाथ नृत्य कला पथक तुळशी यांना सन्मानित करताना फणसवाडी मंडळाचे पदाधिकारी.
--
फणसवाडीत रंगला जाखडी नृत्याचा आविष्कार

गुढीपाडव्यानिमित्त आयोजन; यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

मंडणगड, ता. २६ ः गुढीपाडव्याचे औचीत्यसाधून तुळशी फणसवाडी येथे राधाकृष्ण मंदिर मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जाखडी नृत्य या लोककलेचा कला आविष्कार रंगला. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने अभिषेक, श्रीसत्यनारायणाची महापूजा, हळदी-कुंकू समांरभ, सुस्वर भजन, सांघिक मनोरंजनाचे खेळ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सांस्कृतिक चळवळीचा वारसा पुढे चालविताना स्थानिक कलासंचाचे जाखडी नृत्याचे कार्यक्रम ठेवण्यात आले. त्याला तुळशीवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गण, गौळण, अध्यात्मिक, पौराणिक पद, सामाजिक जागृती यावर आधारित रचना सादर करण्यात आल्या. तसेच गुरुवर्य (कै.) शंकर धाडवे यांना काव्यातून आदरांजली वाहण्यात आली. कलाकारांच्या नृत्याने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कलासंचांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, प्रतिमा देवून गौरविण्यात आली. फणसवाडीतील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्याचे वाटप करून गौरव करण्यात आला. यामध्ये इस्रो भेट विज्ञान चाळणी परीक्षा व भास्कराचार्य गणित परीक्षेत यश संपादन केलेल्या राजकृष्ण धाडवे याचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष पांडुरंग बाईत, हरिश्चंद्र खांबे, अस्मिता केंद्रे, संतोष पोस्टुरे, रामचंद्र पारधी, संजय शेडगे, अनंत केंद्रे, संजय घागरुम, अभय पिचुर्ले, कैलास धाडवे, दिनेश शिगवण, प्रेमळ भोजने, सुजित पारेख व मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.