
क्राईम एकत्रित
जुगार प्रकरणी तिघांवर कारवाई
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर, परटवणे आणि मिरकरवाडा या तीन ठिकाणी बेकायदेशीरपणे जुगार चालवणाऱ्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. २५) दुपारी करण्यात आली. रविकांत वासुदेव घोसाळकर, योगेश कृष्णा फाळके आणि ॠषीकेश दत्ताराम मुरकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. यातील रविकांत हा मारुती मंदिर येथील चणाभट्टीच्या मागे असलेल्या बंद टपरीच्या आडोशाला, योगेश फाळके हा परटवणे नाका येथील बंद गाळ्याच्या जवळ आडोशाला तर ॠषीकेश मुरकर हा मिरकरवाडा पेट्रोल पंपाच्या मागे विना परवाना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम घेउन जुगार खेळ चालवत होते. या तिघांवरही महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
--
गावठी दारू विक्रीप्रकरणी कारवाई
रत्नागिरी : शहरातील भाट्ये-मुरकरवाडी येथे गावठी दारु विक्री करणाऱ्ंयाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. २५) सायंकाळी करण्यात आली. सोमनाथ सोनुराम लावत्रे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस नाईक वैभव नार्वेकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सायंकाळी सोमनाथ लावत्रे हा भाट्ये मुरकरवाडी येथील बंधारा रस्त्यावरील पडीक झोपडीत गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्याजवळ बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. लावत्रे विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-