सावर्डेत श्रीराम जन्मोत्सवाला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावर्डेत श्रीराम जन्मोत्सवाला प्रारंभ
सावर्डेत श्रीराम जन्मोत्सवाला प्रारंभ

सावर्डेत श्रीराम जन्मोत्सवाला प्रारंभ

sakal_logo
By

rat२७१७.txt

बातमी क्र. १७ (टुडे पान ३ साठी)

सावर्डेत श्रीराम जन्मोत्सवाला प्रारंभ

१३० वर्षांची परंपरा; विविध कार्यक्रम, गुरुवारी मुख्य दिवस

सावर्डे, ता. २७ ः येथील कासारवाडीतील श्रीराम मंडळ यावर्षी १३० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त रामनवमी उत्सवाला आज (ता. २७) पासून प्रारंभ झाला. ३१ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
आज श्री सत्यनारायण महापूजा व रात्री हभप विजय महाराज वारे यांचे प्रवचन झाले. मंगळवारी (ता. २८) विणापूजन तसेच श्रीराम जन्मोत्सव कीर्तन, गुरुवारी (ता.३०) श्रीरामजन्म कीर्तन व रात्री श्रीराम पालखी दिंडी सोहळा, शुक्रवारी (ता.३१) महाप्रसाद, रात्री दोनअंकी विनोदी नाटक होणार आहे.
गुढी पाडव्यापासून मंदिरामध्ये नित्य आरतीला सुरुवात होते. चैत्र शुद्ध षष्टीदिवशी वर्धापनदिनी सत्यनारायण महापूजेने याची सुरुवात होते. सप्तमी ते दशमी या कालावधीत विणापूजन व सप्ताह साजरा होतो. या दरम्यान आरती, भजन, कीर्तन तसेच पालखीसोहळा अशा भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. येथील स्थानिक कलाकार या नाटकात सहभागी होतात. नेपथ्य व दिग्दर्शनसुद्धा याच मंडळातील अनुभवी व्यक्तींकडून केले जाते. ३१ ला रात्री १० वाजता दशरथ राणे लिखित व सावर्डे ग्रामपंचायत माजी सदस्य हरहुन्नरी कलाकार देवराज गरगटे दिग्दर्शित दोन अंकी धम्माल विनोदी नाटक ''बायको असून देखणी'' हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक कलाकार सूरज बिजितकर, ओंकार डोंगरे, ओंकार पोकळे, विलास दीडपसे, सचिन पोकळे, देवराज गरगटे, गौरव वारे व मैथिली निमकर यांचा समावेश आहे.
......