
क्राईम एकत्रित
बातमी क्र.२४ (पान ३ साठी)
वाहतूक पोलिसाला धमकी, संशयितावर गुन्हा
रत्नागिरी, ता. २७ ः शहरातील मिऱ्या-नागपूर मुख्यरस्त्यावरील साळवी स्टॉप येथे वाहतूक शाखेच्या पोलिसांशी हुज्जत घालून शासकिय कामात अडथळा केला या प्रकरणी संशयितावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश चंद्रकांत खेत्री (पत्ता समजून येत नाही) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (ता. २६) सायंकाळी सहाच्या सुमारास मिऱ्या-नागपूर मुख्यरस्त्यावर साळवीस्टॉप येथे घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहतूक शाखेचे पोलिस शिपाई प्रशांत बंडबे हे साळवी स्टॉप येथे रविवारी चार ते आठ यावेळात सेवा बजावत असताना संशयित खेत्री रिक्षा घेऊन आले. रिक्षात नरेद्र बिरादार, विक्रांत शिंदे हे देखिल होते. रिक्षातून उतरुन संशयिताने तू मागे माझ्या भावाचे रिक्षाचे फ्रंट सीटचा मोबाईवर फोटो का काढला असे पोलिस प्रशांत बंडबे यांना विचारणा करुन शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी पोलिस शिपाई बंडबे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.
--
मिरजोळे गावठी हातभट्टीवर छापा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या मिरजोळे येथील नदीकिनारी हातभट्टी अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये एकूण १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय अविनाश पालकर (वय ३३, रा. शिरगाव आडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (ता. २६) सकाळी मिरजोळे पाटीलवाडी येथील नदीकिनारी असलेल्या झाडी झुडपाच्या भागात निदर्शनास आला. या कारवाईत २ हजार ३०० रुपयांचे पत्र्याचे बॅरल, १०० लिटर कुचके रसायन, १० हजार ९०० रुपयांची तीन बॅरल, त्यामध्ये २०० लिटर नवसागर मिश्रीत कुजके रसायन, ३०० रुपयांची डेग, ५० रुपयांचा चाटू, ८५० रुपयांची १५ लिटर दारु असा १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बेंदरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.