राजापूर ः राजापुरातील आठ गावांना नको ''जलजीवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः राजापुरातील आठ गावांना नको ''जलजीवन
राजापूर ः राजापुरातील आठ गावांना नको ''जलजीवन

राजापूर ः राजापुरातील आठ गावांना नको ''जलजीवन

sakal_logo
By

KOP21K79289

राजापुरातील आठ गावांना नको ''जलजीवन''

मुबलक पाणी ; तालुक्यातील १९८ पाणी योजनांना वर्कऑर्डर

राजापूर, ता. २७ ः जलजीवन मिशनअंतर्गत ’हर घर नलसे जल’ हा उपक्रम राबवून शासनातर्फे घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करताना भविष्यामध्ये तालुका टँकरमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तालुक्याची पाणीटंचाई दूर करणार्‍या या योजनेच्या आराखड्याची ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे अंमलबजावणी सुरू झाली आहे. आठ गावांमध्ये मुबलक स्वरूपामध्ये पाणी उपलब्ध असल्याने जलजीवन मिशन योजनेंतर्गंत नळपाणी योजनेची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या गावांचा जलजीवन मिशन योजनेंतर्गंत ‘नो डिमांड’ म्हणून घोषित केल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता खोत यांनी दिली.
दरम्यान, जलजीवन मिशन योजनेतून १९८ नळपाणी योजनांना वर्कऑर्डर देण्यात आली आहे. त्यापैकी सद्यःस्थितीमध्ये ७८ कामे सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये २० कामे सुरू होणार आहेत. ज्या वर्कऑर्डर मिळालेल्या ठेकेदारांनी अद्यापही कामांना आरंभ केलेला नाही त्यांनी तातडीने आरंभ करावा अशी सूचना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता खोत यांनी केली आहे.
या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करण्यात येणार आहे. यापूर्वी अस्तित्वातील ४० लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणार्‍या जुन्या योजनादेखील आता ५५ लिटर प्रतिमाणसी प्रतिदिवस योजनेमध्ये परिवर्तित केल्या जाणार आहेत. या योजनेची तालुक्यात अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सर्व्हेक्षण करून आराखडा तयार करण्यात आला आहे. सुमारे ८८ कोटी रुपयांच्या या आराखड्यामध्ये तब्बल २२३ नळपाणी योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.

चौकट ः
नो डिमांड असलेली गावे
धोपेश्‍वर ः तिठवली
जैतापूर ः जैतापूर, अनंतवाडी, चव्हाणवाडी
तारळ ः चौके
कोंडसर बुद्रुक ः कोंडसर खुर्द
पन्हळेतर्फे सौंदळ ः पन्हळेतर्फ सौंदळ
नाणार ः नाणार

चौकट ः २
दृष्टिक्षेपात जलजीवन मिशन योजना आराखडा
नळपाणी योजना ः २२३
आराखड्याची अंदाजित रक्कम ः ८८ कोटी
वर्कऑर्डर मिळालेल्या नळपाणी योजना ः १९८
सद्यःस्थितीमध्ये सुरू असलेली कामे ः ७८