
बांद्यातील बॅडमिंटन स्पर्धेत पंखानिया, कवठणकर विजेते
91773
डेगवे ः बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना रोटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
बांद्यातील बॅडमिंटन स्पर्धेत
पंखानिया, कवठणकर विजेते
बांदा, ता. २७ ः रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ, बांदा यांच्यातर्फे डेगवे येथे आयोजित मिडनाईट बॅडमिंटन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत मनीष पंखानिया आणि मेघल कवठणकर यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. क्षितिज परब आणि अमोघ आजगावकर उपविजेते, तर स्वप्नील सावंत व धनंजय परब तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. तिन्ही संघांना चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, स्पोर्ट्स चेअरमन रोहन कुबडे, दत्तराज चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, साईस्वरूप देसाई, साई सावंत, अक्षय कोकाटे, ओंकार पावसकर, शिवम गावडे, मुईन खान, कौस्तुभ दळवी, कल्याणदास धुरी, अमित धोंगडे, अजिंक्य पावसकर आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता असूनही योग्य संधी मिळत नाही. अशा स्पर्धांमधून चांगले खेळाडू तयार व्हावेत व भविष्यात हेच खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसावेत, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून रोटरॅक्ट क्लबने स्पर्धा आयोजित केली, असे अक्षय मयेकर यांनी सांगितले. भविष्यात व्यापक स्वरुपात विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.