रत्नागिरी-तरुणाला 20 वर्षे सश्रम कारावास, दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-तरुणाला 20 वर्षे सश्रम कारावास, दंड
रत्नागिरी-तरुणाला 20 वर्षे सश्रम कारावास, दंड

रत्नागिरी-तरुणाला 20 वर्षे सश्रम कारावास, दंड

sakal_logo
By

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी
तरुणाला २० वर्षे सश्रम कारावास

रत्नागिरी, ता. ३१ ः अल्पवयीन मुलीवर वारंवार अतिप्रसंग करून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि २६ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली.
नीलेश देवजी गुरव (वय ३३) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडली होती. नीलेश याचे पीडितेच्या घरी जाणे-येणे होते. पीडिता घरी एकटीच असल्याची संधी साधून नीलेश तिच्या घरी गेला. त्याने तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी पिऊन झाल्यानंतर पीडिता तांब्या किचनमध्ये ठेवण्यासाठी गेली असता नीलेशने तिच्यावर बलात्कार केला. तसेच झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेचे आई-वडील कामासाठी बाहेर गेल्यावर ती एकटीच घरी असताना जानेवारीत तिच्यावर वारंवार अतिप्रसंग केला.
या दरम्यान पीडिता गरोदर असल्याचे पालकांना समजताच त्यांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सोंतर्गत नीलेशवर गुन्हा दाखल केला होता. तपास नाटे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील करत होते. तपासात पोलिसांनी नीलेशला अटक करून दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते. शुक्रवारी (ता. ३१ मार्च) येथील विशेष पोक्सो न्यायालयात या खटल्याचा निकाल झाला. सरकारी पक्षातर्फे विशेष पोक्सो सरकारी अभियोक्ता अॅड. मेघना नलावडे यांनी युक्तिवाद केला. या खटल्यात १५ साक्षीदार तपासले. विशेष पोक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास २६ हजार दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल दिगंबर ठीक यांनी काम पाहिले.