
मंत्री राणेंच्या वाढदिनानिमित्त विद्यार्थिनींना मोफत सायकली
मंत्री राणेंच्या वाढदिनानिमित्त
विद्यार्थिनींना मोफत सायकली
कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील ३७९ गरजू शालेय मुलींना स्वखर्चाने सायकल प्रदान करणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी आज केली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी हा सामाजिक उपक्रम सुरू करत असल्याचे श्री.राणे यांनी सांगितले. पहिल्या टप्यात शाळेतील एकूण ३८९ मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रथम १०० विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेच्या माध्यमातून सायकल वाटप करण्यात येणार आहे. जेव्हा ह्या विद्यार्थिनी शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडतील तेव्हा ती सायकल शाळेत जमा केली जाईल व त्याचा लाभ अन्य गरजू मुलींना दिला जाईल असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. यासंदर्भातील गरजू विद्यार्थिनींची आकडेवारी अधिकृतपणे शिक्षण विभागाकडून उपलब्ध झाल्याचे आमदार राणे म्हणाले.
----
कणकवलीत उद्यापासून ‘सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग’
कणकवली : कणकवली बॅडमिंटन क्लब कणकवली आणि के.एन.के. स्मॅशर्सच्या संयुक्त विद्यमाने कणकवलीत बॅडमिंटन लीग स्पर्धा आयोजित केली आहे. नगरपंचायतीच्या क्रीडा संकुलात उद्या (ता.८) सकाळी अकराला आमदार नीतेश राणे यांच्याहस्ते या स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असेल. स्पर्धेतील विजेत्याला रोख २५ हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. द्वितीय विजेत्याला रोख २० हजार आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक नगराध्यक्ष नलावडे यांनी व द्वितीय पारितोषिक के. एन. के. स्मॅशर्स यांनी पुरस्कृत केले आहे. या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. रविवारी (ता.९) या स्पर्धेचा समारोप होणार आहे.
-------------
सरकारे