कळकवणे नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळकवणे नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
कळकवणे नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

कळकवणे नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

sakal_logo
By

- rat१०p५.jpg -
९४७७१
चिपळूण ः कळकवणे येथे नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करताना आमदार शेखर निकम.
-
कळकवणे नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

चिपळूण, ता. १० ः ओवळी-कळकवणे दादर-वालोटी ग्रॅव्हिटी नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी अन्य विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटने येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाली. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
नळपाणी पुरवठा योजना व्हावी अशी तिन्ही गावातील ग्रामस्थांची मागणी होती. त्याचा पाठपुरावा कळकवणे दादर-ओवळी-वालोटी शिखर समिती अध्यक्ष अॅड. अमित अशोकराव कदम व त्यांचे सहकारी यांनी केला. यासाठी जि. प. माजी विरोधी पक्षनेते अशोकराव कदम यांचे सहकार्य मिळाले होते. आमदार निकम यांच्या सहकार्याने ही योजना मंजूर होऊन कामाला सुरवात झाली. तसेच रामवरदायिनी मंदिराकडे जाणारा पूल, कळकवणे अडरेकरवाडी व कळकवणे गुरववाडी रस्ता या कामांचे उद्घाटन आमदार निकम यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले. तसेच कळकवणे अडरेकरवाडी येथे मंजूर झालेल्या नवीन ट्रान्सफॉर्मरचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अशोक कदम, राष्ट्रवादी रत्नागिरी लीगल सेल जिल्हाध्यक्ष अॅड. अमित कदम यांच्यासह सूर्यकांत खेतले उपस्थित होते.