बंद नाट्यगृहाचा विचार करा

बंद नाट्यगृहाचा विचार करा

rat१०१७.txt

बातमी क्र..१७ (टुडे २ साठी, अॅंकर)

शृंगारतळी, चिपळुणातील बंद नाट्यगृहाचा विचार करा

अभिनेते संजय खापरे ः मुलांना बालनाट्य शिबिरात पाठवू नका

चिपळूण, ता. १० ः ज्या पालकांना आपली मुले अभिनय क्षेत्रात यशस्वी व्हावीत असं वाटतं त्यांनी मुलांना बालनाट्य शिबिरात पाठवू नये. या ठिकाणी भाषेचे, अभिनयाचे बरेचदा चुकीचे संस्कार केले जातात. मग हीच भाषा, हेच अभिनयाचे संस्कार पुढे टिकून राहतात आणि मग ते सुधारणे फार अवघड होतं. अभिनय नैसर्गिक हवा, तो बालनाट्य शिबिरातून घडवला जात नाही, असे रोखठोक मत अभिनेते संजय खापरे यांनी मांडले. तसेच शृंगारतळी, चिपळूण येथील नाट्यगृह बंद आहेत, याचे दुःख होतं. ही नाट्यगृह का बंद आहेत, याचा विचार करण्याची गरज असल्याचे खापरे यांनी सांगितले.
येथील भावार्थ पुस्तकालयाच्या वतीने नाट्यकट्टा उपक्रमांतर्गत शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात अभिनेते संजय खापरे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रियंका तेंडुलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून संजय खापरे यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास उलगडला गेला. या वेळी ते म्हणाले, ''यदा कदाचित'' नाटकाच्या निमित्ताने कोकणातील प्रेमळ माणसं मला भेटली. वर्षातून चार-पाचवेळा मी गावी येतो. ही ओढ मला लागली. शृंगारतळी, चिपळूण येथील नाट्यगृह बंद आहेत, याचे दुःख होतं. ही नाट्यगृह का बंद आहेत, याचा विचार करण्याची गरज आहे. माझ्या अभिनयाचे लोकांनी कौतुक करावं, अभिनयामुळे मला लोकांनी ओळखावं, असं वाटतं. आजही गावातील रस्त्यांवरून फिरावंस वाटतं. कमी पैसे असताना आम्ही वृंदावन लॉजला राहात होतो. आज चांगले पैसे असले तरीही वृंदावन लॉजला जाऊन राहतो. श्यामची मम्मी नाटक करताना एका वयस्कर महिलेने मला तीन लेकरं आहेत आणि तिकीट घेऊन मला नाटक पाहता येणार नाही, असं सांगितलं. तेव्हा मनाला चटका बसला. म्हणूनच मी दिशा संस्थेच्या माध्यमातून ''डोन्ट वरी हो जायेगा'' या नाटकाची निर्मिती केली आहे. सर्वसामान्य लोकांना परवडेल, अशा तिकीटदरात त्यांना नाटके पाहता यावीत, असा माझा सातत्याने प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ओंकार भोजने माझा आवडता नट आहे. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. सध्या ओंकार भोजने आणि मूळशी पॅटर्नमधील ओम भूतकर हे दोन उत्तम नट नव्याने रंगभूमीला मिळाले आहेत. राडारड पाहिजे, ही एकांकिका ओंकारने एमडी कॉलेजमध्ये बसवली होती. त्यावर ओंकार नाटक लिहितोय, तोच दिग्दर्शित करतोय आणि त्यामध्ये मी काम करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
-

नाटक ही अभिजात चळवळ
नाटक ही अभिजात चळवळ आहे. यातूनच खऱ्या अर्थाने कलाकार घडत असतो आणि प्रेक्षकांना काहीतरी खाद्य मिळत असते. नागराज मंजुळे हे एक ग्रेट दिग्दर्शक आहेत. नव्या कलाकारांना घेऊन ते सुंदर अशी कलाकृती निर्माण करतात. मुलांच्या हातात मोबाईल द्या; परंतु तो किती वेळ आपल्या हातात ठेवायचा हे मुलांनी ठरवायला हवे, असेही खापरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com