....तर जगणे आनंदाचे होऊ शकते

....तर जगणे आनंदाचे होऊ शकते

(टुडे पान २ साठी, मेन)


- rat१०p१०.jpg-
९४७८४
रत्नागिरी ः योगीदास वसंत नारायण मराठे उपाख्य काकांनी लिहिलेल्या नित्य चिंतनमालाच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळात रविवारी झाले. डावीकडून श्रीनिवास जोशी, नाना जोशी, राजेंद्र पाटणकर, विनय मराठे, डॉ. कल्पना आठल्ये, अॅड. दीपक पटवर्धन, नंदकुमार मराठे, पुंडलिक पावसकर आदी.
-
....तर जगणे आनंदाचे होऊ शकते

डॉ. संजय उपाध्ये ः समाधानाची गुरुकिल्ली पुस्तकांचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण रडत राहतो त्या ऐवजी त्या गोष्टींच्या दुसऱ्या बाजूकडून जर आपण पाहिले तर जगणे आनंदाचे होऊ शकते, असे प्रतिपादन प्रख्यात प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. योगीदास वसंत नारायण मराठे उपाख्य काकांनी लिहिलेल्या नित्य चिंतनमाला समाधानाची गुरूकिल्ली भाग १ आणि २ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या श्री परशुराम सभागृहात झाले. त्या वेळी डॉ. उपाध्ये बोलत होते.
उपाध्ये यांनी ''जिंकलो असे म्हणा'' हा हसतखेळत जगण्याचा मूलमंत्र देणारा अतिशय सहजसुंदर हास्यसंवाद सादर केला. काकांशी त्यांचा आलेला संबंध आणि त्यातून जोडलेल्या स्नेहाचा उल्लेख करत ''जिंकलो ऐसे म्हणा'' ही कविता सादर केली. व्याख्यानातून जगण्याचा एक वेगळा; पण आनंदी मार्ग दाखवला. या कार्यक्रमाला कीर्तनकार हभप नाना जोशी, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख प्रा. डॉ. कल्पना आठल्ये, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, खल्वायन संस्थेचे श्रीनिवास जोशी आणि निःस्पृह रूग्णसेवा देणारे पुंडलिक पावसकर उपस्थित होते.
योगीदास काका मराठे फाउंडेशनचे विश्वस्त आणि मुलगा विनय मराठे यांनी सांगितले की, काकांनी आपल्या जीवनातले पुढील उपक्रम आधीच लिहून ठेवले होते; परंतु अचानकपणे त्यांनी इहलोकीची यात्रा संपवल्यामुळे त्यांचे ते उपक्रम अर्धवट राहिले. काकांच्या त्या इच्छांना पूर्ण करण्याचा प्रयत्न आपणा सर्व साधकांच्या सहकार्याने आम्ही करत आहोत. राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी काकांच्या राजकारण निवृत्तीचा आवर्जून उल्लेख करत आध्यात्मामध्ये साधकाने कसं असावं, याचं सुंदर उदाहरण म्हणून काकांचं चरित्र आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल, असे सांगितले. काकांच्या आध्यात्मिक केंद्र स्थापनेत आणि अन्य सर्व उपक्रमात आवश्यक ती मदत करू, असा विश्वास रत्नागिरीकरांच्यावतीने त्यांनी व्यक्त केला. या वेळी कार्यक्रम समन्वयक म्हणून नंदकुमार पटवर्धन यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन मुंबई आकाशवाणीचे निवेदक राजेंद्र पाटणकर यांनी केले.
-
कोकणात आध्यात्मिक केंद्र

काकांचे अनेक साधक कोकण परिसरामध्ये आहेत. त्या साधकांच्या साधनेकरिता कोकणातच एखादे आध्यात्मिक केंद्र असावे, अशी काकांची इच्छा होती. त्या अनुषंगाने एखादी जागा घेऊन त्या ठिकाणी आध्यात्मिक केंद्र उभारण्याची भविष्यकालीन योजना आहे आणि त्यामध्ये आपणा सर्वांचं सहकार्य मिळेल, असा विश्वास विनय मराठे यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com