रहाटेंचा सत्कार

रहाटेंचा सत्कार

- rat१०p७.jpg -
९४७७३
साखरपा ः डॉ. पंकज मित्तल यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना विलास रहाटे.
---
देवरूखचे रांगोळी कलाकार
विलास रहाटेंचा सत्कार

साखरपा ः देवरूख येथील विश्वविक्रमी युवा रांगोळी कलाकार विलास रहाटे यांचा आंतरराष्ट्रीय युथ फेस्टिव्हलमध्ये सत्कार करण्यात आला. या फेस्टिव्हलमध्ये २२ देशांचे कलाकार सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय युथ फेस्टिव्हल पंजाब येथे झाला. रांगोळीसह छायाचित्रण, स्पॉट पेंटिंग आणि मेंदी या चार कलाप्रकारांचा आणि त्यातील कलाकारांचा समावेश करण्यात आला होता. देवरूख येथील विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांची निवड करण्यात आली होती. रहाटे यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्वात छोट्या रांगोळीच्या विश्वविक्रमाची आणि विद्यापीठातून मिळवलेल्या सुवर्णपदकांची दखल घेत त्यांची निवड देशातर्फे करण्यात आली होती. या वेळी डॉ. अशोक मित्तल आणि पंकज मित्तल यांच्या हस्ते रहाटे यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या फेस्टिव्हलमध्ये वन्यजीवन या विषयावर रहाटे यांनी काढलेली रांगोळी विशेष चर्चेत राहिली. या रांगोळीसाठी ३ तास लागल्याचे रहाटे यांनी सांगितले.
-
फोटो ओळी
-rat१०p११.jpg ः
९४७९८
गोवा ः राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारताना रसिका रेवाळे.
-
रसिका रेवाळेंना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार

मंडणगड ः जिल्हा परिषद शाळा सावरी नं. १ या शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या रसिका रेवाळे यांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रजि.) बेळगाव यांच्यातर्फे राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने गोवा हर्मल पंचक्रोशी शिक्षण येथे झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. रेवाळे यांचे नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्य, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रातील शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल २६ मार्चला हर्मल गोवा येथे झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे सावरी गावचे ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षण अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
-
फोटो ओळी
-rat१०p१२.jpg ः
९४७९९
मंडणगड ः नूतन अध्यक्ष नरेंद्र सकपाळ व कार्यकारिणी यांचे अभिनंदन करताना मान्यवर.
-
कास्ट्राईब शिक्षक संघटनेची
मंडणगडची कार्यकारिणी जाहीर

मंडणगड ः शिक्षकांच्या मुलभूत समस्यांबरोबरच समाज, शिक्षण आणि संविधानिक न्याय्य हक्कांबाबत जागृत आणि अग्रेसर असणाऱ्या कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मंडणगड तालुका नूतन कार्यकारिणी राजमाता जिजाऊ सभागृहात जाहीर करण्यात आली. या वेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे, उपाध्यक्ष एन. के शिंदे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे, स्मिता कालेकर, संतोष मोहिते आदी उपस्थित होते. महासंघाचे तालुकाध्यक्ष विशाल जाधव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मंडणगड नूतन कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष- नरेंद्र सकपाळ, कार्याध्यक्ष- सुनील मालुसरे, उपाध्यक्ष- नरेश गोरे, रमेश बोरकर, सचिव- सुरूपसिंग मावळी, सहसचिव- हिरालाल दाभाडे, कोषाध्यक्ष- रवींद्रनाथ सोमवंशी, सहकोषाध्यक्ष-देविदास ठोंबरे, महिला संघटक- रक्षाली मोरे, अनिता नवले, तालुका संघटक- नीलेश लोखंडे, बीट संघटक- संतोष मोरे, विजय आडे, तानाजी सांगडे.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com