बीएसएनएल 25 टॉवर उभारणार

बीएसएनएल 25 टॉवर उभारणार

बीएसएनएल २५
टॉवर उभारणार
कणकवली, ता. १०ः गावोगावी इंटरनेटच्या सुविधा पोहोचविण्यासंदर्भात डिजिटल इंडिया या योजनेतंर्गत भारत संचार निगम लिमिटेड यांना सिंधुदुर्गमध्ये १६९ टॉवरसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बीएसएनएलच्या महाप्रबंधकांच्या मागणीनुसार यासाठी २०० चौरसमीटर जागा जिल्हाधिकार्‍यांनी उपलब्ध करून देणे, एमएसईडीसीएलमार्फत पायाभूत सुविधा तसेच वीजपुरवठा व जोडणी देणे, ओएफसी केबल टाकण्यासाठी रस्त्याचा वापर करण्याबबत निर्णय घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार देवगड तालुक्यात १४, दोडामार्ग १६, कणकवली २८, कुडाळ १६, मालवण ३६, सावंतवाडी २० वैभववाडी २५, वेंगुर्ले २५ अशा टॉवरचा समावेश असणार आहे.
-------------------
कळसुलीत २९ ला
धार्मिक कार्यक्रम
कणकवलीः कळसुली-गवसेवाडीतील श्री नाईटीये देवीच्या ठिकाणी २९ एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दुपारी ३.३० वाजता श्रींची महापूजा, सायंकाळी ५.३० आरती व तीर्थप्रसाद, ६ वाजता हरिपाठ, ७ वाजता भजन, ८ वाजता सत्कार, ८.३० वाजता पैठणीचा खेळ, रात्री ९ वाजता भजनी बुवा संदीप लोके व संदीप पुजारे यांच्यात डबलबारीचा सामना होईल.
------------------
मळगाव हायस्कूलचे
विविध स्पर्धांत यश
सावंतवाडीः नॅशनल स्टीम प्रोग्रॅम २०२२-२३ मार्फत कुडाळ हायस्कूल येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये मळगाव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. नॅशनल स्टीम प्रोग्राम २०२२-२३ मार्फत कुडाळ हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी सायन्स कॉम्पिटिशन आयोजित केली गेली. त्यामध्ये मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये सातवीच्या नारायण मांजरेकर याने प्रथम, टिंकर कॉम्पिटिशनमध्ये नववीच्या रोहन परब याने द्वितीय क्रमांक पटकावला. समृद्धी राऊळ हिनेही प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतला. या यशाबद्दल मळगाव ऐक्यवर्धक संघाचे सचिव आर. आर. राऊळ, अध्यक्ष शिवराम मळगावकर, खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक फाले, पर्यवेक्षक कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
------------------
‘भगीरथ’ देणार
शेतकऱ्यांना अनुदान
माणगावः भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान (झाराप) व ग्रुप ग्रामपंचायत वसोली यांच्यावतीने वसोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या वसोली, उपवडे, आंजिवडे व साकिर्डे गावातील शेतकऱ्यांना गोबर गॅस व गांडूळ खत तयार करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. कुडाळ कृषी विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गोबर गॅस बांधणाऱ्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायत हजार भगीरथ प्रतिष्ठानकडून ६ हजार रुपयांचे साहित्य, शेतकऱ्यांचे स्वतःचे श्रमदान व उर्वरित रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गांडूळ खत तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिष्ठानकडून बेडसाठी ७५० रुपये दिले जाणार आहेत.
.....................
नेत्रचिकित्सेस
वसोलीत प्रतिसाद
माणगावः वसोली ग्रामपंचायत व वेतोबा ऑप्टिशिअन (माणगाव) यांच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात गरजूंना माफक दरात चष्मे देण्यात आले. तसेच दहा रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
...................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com