मळगावातील चौघांवर मारहाणप्रकरणी गुन्हा

मळगावातील चौघांवर मारहाणप्रकरणी गुन्हा

मळगावातील चौघांवर
मारहाणप्रकरणी गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः टेम्पो उभा करण्याच्या वादातून मळगाव येथे वृध्दाला घरात घुसून दांड्याने मारहाण करण्यात आली. यात वृद्ध गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ७) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मधुकर गंगाराम जाधव (वय ६०) असे जखमीचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाळा जाधव, दिनेश जाधव, बबन जाधव, केशव जाधव (सर्व रा. मळगाव जाधववाडी) या चौघांविरोधात मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार मधुकर जाधव यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जाधव कुटुंबीयांत जमीन जागेच्या कारणावरून वाद आहेत. यातील संशयितांनी आयशर टेम्पो उभा करण्याच्या कारणावरून तक्रारदार व साक्षीदारा यांच्याशी वाद घातला. या वादातून निर्माण झालेल्या भांडणातून घरात घुसून मारहाण केली. यात जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवीगाळ करून मारहाण व गंभीर जखमी केल्याप्रकरणी संशयित चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com