विलवडे ओहोळाने घेतला मोकळा श्वास

विलवडे ओहोळाने घेतला मोकळा श्वास

swt१०९.jpg
९४८३२, 94830
विलवडे ः येथील ओहोळ स्वच्छता मोहिमेप्रसंगी संदीप गावडे, सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी अन्य. दुसऱ्या छायात्रितात स्वच्छतेनंतरचा ओहोळ.

विलवडे ओहोळाने घेतला मोकळा श्वास
लोकसहभागातून स्वच्छता ः दळवी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १० ः विलवडे ग्रामपंचायत ते महारकाटे अशा ओहोळातील गाळ उसपा आणि साफसफाई करण्यात आल्याने येथील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या कामाचा प्रारंभ पंचायत समिती माजी सदस्य संदीप गावडे यांच्या हस्ते झाला. विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांच्या संकल्पनेतून व एस. आर. दळवी फाउंडेशनचे सर्वेसर्वा आबाजी दळवी यांच्या प्रेरणेतून विलवडे-मळावाडी ग्रामस्थांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.
या ओहोळामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचा गाळ साचलेला होता. ओहोळामध्ये झाडी वाढल्याने पावसाळ्यात पाण्याचा कृत्रिम साठा होऊन शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत होते. विलवडे-वाफोली मुख्य मार्गावरील पुलावर पाणी येऊन हा मार्ग बऱ्याच वेळी पाण्याखाली जातो. त्यामुळे पावसाळ्यात वाहतूक सुद्धा ठप्प होत होती. सरपंच दळवी, पंचायत समिती माजी सदस्य संदीप गावडे, एकनाथ दळवी, आत्माराम दळवी, प्रताप दळवी, विलवडे-मळावाडी येथील माऊली कला, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम दळवी, सचिव प्रवीण दळवी, खजिनदार विठ्ठल दळवी व मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. २०२१ मध्ये ओहोळातील पुराच्या पाण्याच्या वेढ्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. घरांची पडझड सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली होती. या उपक्रमामुळे गाळ, वाढलेली झाडीझुडपे साफ झाल्याने बऱ्याच अंशी पुराचा धोका टळणार आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी सरपंच दळवी, उपसरपंच विनायक दळवी, प्रदीप दळवी, मोहन दळवी, कृष्णा सावंत, सुभाष दळवी व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
..................
चौकट
मळावाडी महिला
मंडळाचे कौतुक
एस. आर. दळवी फाउंडेशनचे आबा दळवी यांनी स्वच्छ प्लास्टिक मुक्त व हरित गाव अभियान अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत मळावाडी महिला मंडळाने द्वितीय क्रमांक मिळविला होता. यासाठी त्यांना दिलेली साडेआठ हजार रुपये बक्षीस रक्कम मंडळाने या उपक्रमासाठी देऊन वेगळा आदर्श निर्माण केला. मंडळातील सायली दळवी, पूर्वा दळवी, मानसी दळवी, प्रतिभा दळवी, सपना गुळेकर, अस्मिता दळवी, जानवी सचिव, प्रीतम सचिव, प्राजक्ता सचिव, गायत्री दळवी, चंद्रावती दळवी, वासंती दळवी व त्यांच्या सहकारी महिलांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
..................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com