गुहागर-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

गुहागर-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

वीजबिल वसुलीत गुहागर
जिल्ह्यात अव्वल
गुहागर ः गुहागर महावितरणने ३१ मार्चअखेर वसुलीत भरारी घेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये कर्मचार्‍यांचा सिंहाचा वाटा असून लवकरच त्यांचा सन्मान करण्ययात येणार असल्याची माहिती महावितरणचे विभागीय उपव्यवस्थापक अशोक मोहिते यांनी दिली. तालुक्यात निवासी, शेतीपंप, पथदीप, शासकीय कार्यालये, व्यावसायिक आदी ग्राहकांची १ कोटी १२ लाखांची वीजबिल थकबाकी होती. ही वसुली करताना अनेक अडचणींचा सामना वीज कर्मचार्‍यांना करावा लागला होता.


खेड पालिकेचा
दवाखान्याला घरघर
खेड ः येथील नगर पालिका दवाखान्यासाठी ११ आस्थापनांची पदे मंजूर असतानाही सद्यःस्थितीत केवळ एक नर्सच कार्यरत असल्याची बाब पुढे आली आहे. दवाखान्यात वैद्यकीय अधिकारीच नसल्याने गर्भवतींसाठी असलेले प्रसूतीगृह बंद ठेवण्याची नामुष्की नगर प्रशासनावर ओढवली आहे. शहरातील तरुणांवर उपचारांसाठी असलेला नगर पालिका दवाखाना अखेरची घटका मोजत असून नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे. शहराची लोकसंख्या सुमारे १७०८३ आहे. शहराचा विस्तारही दिवसेंदिवस वाढतच आहे. एकीकडे शहराचा विस्तार वाढत असताना दुसरीकडे मात्र शहरातील रुग्णांवर उपचारासाठी असलेला नगर पालिका दवाखाना अखेरची घटका मोजत आहे.

जिल्हा माध्यमिक पतपेढी
निवडणूक रंगतदार होणार
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा माध्यमिक सेवकांची पतपेढी गेले काही महिने विविध आरोपांमुळे गाजत असतानाच या पतपेढीच्या निवडणुकीचे बिगुलही वाजले आहे. इच्छुक उमेदवारांची वाढती संख्या, जुळून आलेली नवी समीकरणे आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी ७५ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून नजीकच्या काळात काही समीकरणे बदलण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. अनेक कारणांमुळे ही निवडणूक सध्या अत्यंत रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. गेली काही वर्षे माध्यमिक अध्यापक पतपेढीत शिक्षक परिषद, कास्ट्राईब संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना व समर्थकांकडून कारभार हाकला जात होता. कोरोना काळात निवडणूक काहीशी लांबली असली तरी आता या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे; मात्र या वेळी नव्या आघाड्यांची नवी आश्‍चर्यकारक समीकरणे पाहायला मिळत आहेत. या वेळी टीडीएफ, कास्ट्राईब संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, मुख्याध्यापक संघ यांनी हातमिळवणी केली असून या गटाला शिक्षक सेना व प्रयोगशाळा सहाय्यक संघटनांनी पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले. --------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com