चिपळूण ः यंदाची अक्षयतृतीया परराज्यातील आंब्यांचा आस्वाद घेऊनच

चिपळूण ः यंदाची अक्षयतृतीया परराज्यातील आंब्यांचा आस्वाद घेऊनच

हापूसचे छायाचित्र वापरावे..

परराज्यातील आंब्यांच्या आस्वादाने
अक्षयतृतीया होणार साजरी
चिपळूण बाजारपेठ ; हापुसची आवक मर्यादित असल्याने दर वधारलेले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हापूस आंबा परिपक्व झाला असला तरी वधारलेल्या दरांमुळे सध्या खवय्यांना परराज्यातील आंब्यावरच आपली हौस भागवावी लागत आहे. स्थानिक बाजारपेठेत हापूस आंब्याची म्हणावी तितकी आवक झालेली नाही; मात्र इतर राज्यातील आंबा मोठ्या प्रमाणात स्थानिक बाजारपेठेत दाखल झाला आहे. त्यामुळे यंदाची अक्षयतृतीया परराज्यातील आंब्यांचा आस्वाद घेऊनच साजरी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षयतृतीया हा सण पुढच्या आठवड्यात साजरा होत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. पुरणपोळीचे सुग्रास जेवण व आमरसाच्या पंगतीची सुरवात खऱ्या अर्थाने याच दिवसापासून होते; परंतु, यंदा सणासुदीला पण पुरेशा प्रमाणात हापूस आंबा बाजारात उपलब्ध होणार नसल्याने यंदा बदाम, पायरी लालबाग, केशरवरच हौस भागवण्याची वेळ आंबाप्रेमींवर येणार आहे. बाजारात कर्नाटक आणि गुजरातमधील आंबा उपलब्ध झाला आहे. फळविक्रेत्यांच्या हातगाडीवर १५० ते २०० रुपये किलो या दराने गुजरात आणि कन्नड आंबा विकला जात आहे. बदाम, पायरी लालबाग, केशरचे दरसुद्धा आवाक्यात आहेत. तुलनेत हापूस आंबा अजूनही हजार ते बाराशे रुपये डझन या दराने विकला जात आहे. अवकाळी पावसाने हंगामाला उशिराने सुरवात झाली; परंतु, उत्पादन चांगले येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; मात्र, हवामान बदल आणि पडलेल्या अवकाळी पावसाने उत्पादन खराब होण्याच्या भितीने शेतकऱ्यांनी वेळेआधीच आंब्याची तोडणी केली. त्यामुळे एपीएमसी बाजारात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दरवर्षीपेक्षा अधिक उत्पादन दाखल होत होते. त्यामुळे दरात घसरण झाली होती. परंतु, बाजारात पुन्हा हापूसची आवक रोडावली असून, दरवाढ होण्यास सुरवात झाली आहे.

कोट
आंबा खरेदीसाठी घाई करू नये. सध्या बाजारात दाखल होणारा आंबा हा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला नसून, कॅल्शिअम कार्बाइडसारख्या रसायनांच्या मदतीने पिकवला जातो. असा आंबा पूर्ण पिवळा दिसतो. त्यामुळे त्याची मूळ चव बदलून तो आरोग्याच्यादृष्टीने त्रासदायक व हानिकारक ठरू शकतो.
- दीपक बुवा कदम, आंबा उत्पादक शेतकरी, पेढांबे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com