कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेकडून कर्जदारांच्या वारसांना साहाय्य

कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेकडून कर्जदारांच्या वारसांना साहाय्य

swt१०१०.jpg
94862
सावंतवाडी : मयत कर्जदारांच्या वारसांना कर्जपुरवठा करताना संस्थेचे सेक्रेटरी मार्टीन आल्मेडा, सरव्यव्स्थापक जेम्स बॉर्जीस.

कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेकडून
कर्जदारांच्या वारसांना साहाय्य
सावंतवाडी, ता. १०ः कॅथॉलिक पतसंस्थेकडून समूह कर्ज सुरक्षा योजना अंतर्गत २ लाख अर्थसाहाय्य नुकतेच मृत कर्जदारांच्या वारसांना देण्यात आले.
कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी या पतसंस्थेमार्फेत संस्थेच्या कर्जदारांकरिता त्यांच्या हिताच्या दृष्टीने ''समूह कर्ज सुरक्षा योजना'' सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कर्जदाराचा २ लाखाचा विमा उतरविण्यात येतो. अलीकडेच संस्थेचे मृत झालेले कर्जदार राजन थापा व गोविंद शेलटे (रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले) यांच्या वारसांना या योजनेंतर्गत संस्थेचे सेक्रेटरी मार्टीन आल्मेडा व सरव्यवस्थापक जेम्स बॉर्जीस यांच्या हस्ते संस्थेमार्फेत प्रत्येकी २ लाखाचा धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली. संस्थेमार्फेत केलेल्या या मदतीसाठी मृत कर्जदारांच्या वारसांनी संस्थेचे तसेच संस्थेच्या संचालक मंडळाचे आभार मानले. संस्थेमार्फेत सुरू केलेल्या या योजनेचा गरजू लोकांना लाभ देता आल्याबाबत संस्थेचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी समाधान व्यक्त केले.
...............
''भगवती कोचिंग''चे यश
सावंतवाडीः सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षा युवा संदेश प्रतिष्ठान, नाटळ सांगवे यांच्यामार्फत घेतली जाते. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून कोलगाव येथील भगवती कोचिंग क्लासेसचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केले. त्यापैकी दुसरीतील योजित करमळकर (गुण १३६, शाळा नं. ३) या विद्यार्थ्याने रौप्य, निधी राऊन (गुण १२०, शाळा नं. २) हिने कांस्यपदक पटकावले. परीक्षेत सहभागी असलेले अरफ शेख, आयुष घाटकर, वैष्णवी धुरी, कृतिका सुतार या सर्वच विद्यार्थ्यांना भगवती कोचिंग क्लासेसच्या संचालिका स्वरा चव्हाण यांचे मागदर्शन लाभले. चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com