स्वच्छता, पाणी प्रश्न सोडवा

स्वच्छता, पाणी प्रश्न सोडवा

swt1013.jpg
94844
बबन साळगावकर

स्वच्छता, पाणी प्रश्न सोडवा
बबन साळगावकरः सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या सावंतवाडी शहरामध्ये स्वच्छतेचा आणि पाण्याचा प्रश्न पुढे आला आहे. प्रशासकीय काळामध्ये यावर दुर्लक्ष होत असून दोन्ही प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन ते मार्गी लावावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली.
साळगावकर यांनी आज मुख्याधिकारी जावडेकर यांना शहरातील समस्यांबाबत निवेदन दिले. त्यामध्ये शहरातील पाणी प्रश्नावर तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सद्यस्थितीत शहरातील उंच भागामध्ये नळाला पाणीपुरवठा होत नाही; मात्र कर्मचारी तेथे पाणीपुरवठा होत असल्याचे फोटो अधिकाऱ्यांना दाखवून दिशाभूल करत आहेत. काही कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढत चालली आहे. कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता नसल्याने नागरिकांना दाखल्यांसाठी अनेक वेळा खेपा माराव्या लागत असून ही बाब गंभीर आहे.
शहरात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. प्रशासकीय कार्यकाळामध्ये यामध्ये बरीच वाढ झाली आहे. शहरात ठिकठिकाणी मासे विक्रेते बसत असून शहरात विद्रुपीकरण आणि गलिच्छपणा वाढला आहे. स्वच्छतेसंदर्भात एकसूत्रता नसून शहरामध्ये ठिकठिकाणी, आतल्या पाणंदी, रस्त्यांमध्ये कचरा दिसत आहे. शहरातील ओले गटार स्वच्छ नाहीत. तलावाच्या पाण्याची दुर्गंधी सगळीकडे पसरत असून काठाच्या बाजूने असलेला कचरा काढणे आवश्यक आहे; परंतु तिथेही कोणी लक्ष देत नाही. सार्वजनिक शौचालयांची दैना झाली असून तिथे स्वच्छता आवश्यक आहे. शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी खडी, वाळू अस्ताव्यस्त पडलेली असते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर उपाय योजना काढण्यासाठी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन प्रशासनातील अनियमता, कर्मचाऱ्यांतील असमन्वय, आणि इतर समस्या दूर करव्यात, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com