रत्नागिरीत 19 एप्रिलपासून कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शन

रत्नागिरीत 19 एप्रिलपासून कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शन

रत्नागिरीत १९ एप्रिलपासून कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शन

रत्नागिरी, ता. १० : कन्झ्युमर्स शॉपी हे गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन पटवर्धन हायस्कूलच्या पटांगणावर १९ ते २३ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या प्रदर्शनात नामवंत कंपन्यांबरोबरच महिला व लघुउद्योजकही मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. हॅन्डीक्राफ्ट, ज्वेलरी, साडी, लेदर पर्सेस, लेडीज गारमेंट, लखनवी फुलकारी, गाऊन्स, टॉप्स, फुड प्रॉडक्टस्, पापड, हेल्थ केअर प्रॉडक्ट, चहा अशी विविध उत्पादने आहेत. तसेच सौंदर्यप्रसाधने, वॉटर प्युरिफायर, नॉनस्टिक कुकवेअर, ओव्हन्स, सुईंग मशिन, मिक्सर, फुड प्रोसेसर, अगरबत्ती, कारपेटस, बेडशीटस, फर्निचर, स्टेनस्टिलच्या विविध स्वयंपाकगृहात लागणाऱ्या वस्तूसुद्धा उपलब्ध होतील. लहान मुलांचे कपडे, आकर्षक खेळणी मिळतील. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आपल्या उत्पादनांची विक्री करताना प्रात्यक्षिके दाखवून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत.
दरवर्षी या प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा अभुतपूर्व प्रतिसाद लाभतो. महाराष्ट्रासह देशभरातील विविध प्रकारच्या नामवंत कंपन्या आपल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहेत.
स्थानिक उद्योजकांचे स्टॉल्ससुद्धा यात आहेत. डेकोविले, रावी ज्वेलरी, पदभ्यंग, ट्रेन्ड्ज फर्निचर, मॉडिला फर्निचर, रामेश्वर इंडस्ट्रीज, राणे टेबल, जिनिअस ऑरगॅनिक, मॅजिक मॉप, फुलकारी, सिबिलाज, मायलेकी, भाबलपूर सारी, ओम साई टॉवेल, शुभश्री, गुजरात नमकीन, वीर फिटनेस, नक्षत्र आर्ट, सोलापूर बेडशिट्स, कौसर सॉक्स, मयुर सरबत, अशोक चप्पल, जडीबुटी, पॉन्डीचेरी बेड, रोटी मेकर, रुपम चुरण, संकल्प लाईट, मेलामाईन्ड क्रॉकरी आदी अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. ज्या उद्योजकांना प्रदर्शनात सहभागी व्हायचे असेल त्यांनी मीनल मोहन मोहाडीकर यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com