कणकवली : पुस्तक प्रकाशन

कणकवली : पुस्तक प्रकाशन

फोटो : kan१०४.jpg

किशोर कदम यांच्या पुस्तकाचे
गुरुवारी कणकवलीत प्रकाशन
कणकवली, ता. १३ : कवी किशोर कदम यांच्या ‘वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. १३) येथे होणार आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नामवंत कवी अजय कांडर यांच्या हस्ते कार्यक्रम होईल. कणकवली कॉलेज रोड, कंझुमर सोसायटी, फ्लोरेट डिझायनिंग कॉलेजच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमावेळी जिल्हा उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. सोमनाथ कदम, नामवंत वकील तथा माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष ॲड. विलास परब, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष संदीप कदम, दर्पण प्रबोधनीचे अध्यक्ष आनंद तांबे आदी उपस्थित राहणार आहेत.
कवी आणि शिक्षक असलेल्या किशोर कदम यांनी विद्यार्थ्यांची वैचारिक जडणघडण व्हावी आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीलाही अधिक धार प्राप्त व्हावी या उद्देशाने त्यांनी ‘वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा’ या शीर्षकाअंतर्गत निबंधमाला लेखनाचे पुस्तक शब्दबद्ध केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com